Maharashtra Weather Alert: कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. २५) पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर तसेच विदर्भातील गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) दिला आहे..पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंडमध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या चक्राकार वाऱ्यापासून छत्तीसगड, झारखंड, उत्तर प्रदेशापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून, नजीबाबाद, शाहजहानपूर, वाराणसी, कमी दाब क्षेत्राचे केंद्र ते उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला होता. पूर्व मध्य प्रदेशातही चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाली आहे..सोमवारी (ता. २४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत गडचिरोलीतील देसाईगंज येथे सर्वाधिक ८७.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Maharashtra Rain Update: मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर पावसाचा 'येलो अलर्ट'.आज (ता. २५) मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा घाटमाथा, विदर्भातील गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार सरींची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड आणि विदर्भातील नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात विजांसह वादळी असल्याने दक्षतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. तसेच उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..सोमवारी (ता. २४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२८.५---२२.५अहिल्यानगर---३१.२---२३.१धुळे---३२---१९.४जळगाव---३१.७---२३.६जेऊर---३३.५---२१.५कोल्हापूर---२५.६---२२.१.Weekly Weather: विदर्भात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता.महाबळेश्वर---१९.४---१७.७मालेगाव---३१.४---२२.४नाशिक---२९.१---२१.८निफाड---३०.५---३१.३सांगली---२६.९---२१.८सातारा---२७.२---२२.१सोलापूर---३४.३---निरंकसांताक्रूझ---३१.५---२५डहाणू---३१.९---२५.१रत्नागिरी---३०.५---२४.६.छत्रपती संभाजीनगर---२९.८---२२धाराशिव---३०.७---२०परभणी---३३---२३परभणी (कृषी)---३१.२---२२.४अकोला---३३.३---२५.८अमरावती---२८.४---२४ब्रह्मपूरी---२६.८---२४.५बुलडाणा---३२.६---२३.चंद्रपूर---२७.२---२४.६गडचिरोली---२६.२---२४.२गोंदिया---२९.४---२२.४नागपूर---२९.७---२३वर्धा---२८.५---२५.२वाशीम---२९.४---२१.४यवतमाळ---२८.४---१९.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१९.४---३२पश्चिम महाराष्ट्र---१७.७---३४.३कोकण---२४.६--३१.९मराठवाडा---२०---३३विदर्भ---१९.६---३३.३.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, गोंदिया, गडचिरोली.विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, नागपूर, चंद्रपूर.विजांसह पावसाची शक्यता : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर, बीड, हिंगोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.