Maharashtra Weather Forecast: राज्याच्या अनेक भागांत दडी मारलेला पाऊस पुन्हा जोर धरण्याची चिन्हे आहेत. बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने पुढील दोन दिवस राज्यात जोरदार वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज (ता. १२) राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे आला असून, राजस्थानच्या श्रीगंगानगरपासून, चुरू, शिवपुरी, दामोह, बिलासपूर, कमी दाबाचे केंद्र, ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर राजस्थानपासून कमी दाबाचे केंद्रापर्यंत आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रात ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकपासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे..शुक्रवारी (ता. ११) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत पालघर जिल्ह्यातील तलासरी येथे सर्वाधिक ३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात पावसाने ओढ कायम असून, कमाल तापमानात वाढ झाल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे..Heavy Rain Alert: विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा; मध्य महाराष्ट्रातही सरी हजेरी लावण्याचा अंदाज.राज्यात पुढील दोन दिवस पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे. आज (ता. १२) पालघर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह, जोरदार सरींची शक्यता, तसेच, उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. .कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढणारदक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आज (ता. १२) तीव्रता वाढून, ही प्रणाली आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे..शुक्रवारी (ता. ११) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३१.४---२१.३अहिल्यानगर---३३.६---२४.१धुळे---३२.०---१९.६जेऊर---३५.५---२०.५कोल्हापूर---३१.१---२१.९महाबळेश्वर---२२.६---१६.९मालेगाव---३२.०---२०.२.Rain Forecast: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह जोरदार पावसाची शक्यता.नाशिक---३०.३---२१.०निफाड---३२.२---२०.५सांगली---३२.९---२१.८सातारा---३१.२---१९.६सोलापूर---३४.७---२३.५सांताक्रूझ---३२.३---२६.०डहाणू---३०.५---२४.०रत्नागिरी---३२.३---२६.०.छत्रपती संभाजीनगर---३३.४---२१.८धाराशिव---३२.८---२१.२परभणी---३३.५---२२.०परभणी (कृषी)---३३.०---२१.२अकोला---३५.०---२४.६अमरावती---३४.६---२४.०ब्रह्मपुरी---३४.३---२५.०बुलडाणा---३२.०---२२.३चंद्रपूर---३६.२---२६.६.गडचिरोली---३३.६--२४.६गोंदिया---३३.२---२२.५नागपूर---३४.५---२४.६वर्धा---३५.०---२५.०वाशीम---३२.४---२१.०यवतमाळ---३२.८---२१.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१९.६---३३.६पश्चिम महाराष्ट्र---१६.९---३४.७कोकण---२४.०--३२.३मराठवाडा---२१.२---३३.५विदर्भ---२१.६---३६.२.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : पालघर, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा.विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, रायगड, नंदूरबार, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.