Maharashtra Weather Forecast: मॉन्सूनने राज्य व्यापला असला तरी राज्यात अपेक्षित जोर पकडलेला नाही. अद्यापही सर्वदूर समाधानकारक पावसाची प्रतीक्षा कायम आहे. आज (ता.२८) कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा, तसेच उर्वरित राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..शुक्रवारी (ता. २६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये हरियानाच्या रोहतक येथे देशातील उच्चांकी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हंगामी कमी दाबाचा पट्टा उत्तर राजस्थानपासून ओडिशापर्यंत सक्रिय आहे. आंध्र प्रदेश प्रदेशपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत, तसेच उत्तर प्रदेशपासून विदर्भ, तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा आहे. उत्तर गुजरात आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून ४.५ ते ५.८ किलोमीटर उंचीवर, तसेच आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे..शनिवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मॉन्सूनच्या ढगांची छाया, तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. मात्र उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी राज्याचे कमाल तापमान ३६ अंशांखाली घसरले आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Rain Update: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा अंदाज.कोकणातील वैभववाडी येथे राज्यातील उच्चांकी ७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळत आहेत. आज (ता. २८ ) कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने, तसेच उर्वरित राज्यात मेघगर्जना विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मॉन्सून ‘जैसे थे’नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २४) संपूर्ण महाराष्ट्र व्यापून, गुजरात, मध्य प्रदेशाचा काही भाग, छत्तीसगड आणि झारखंडच्या आणखी काही भागांत मॉन्सूनने वाटचाल केली. त्यानंतर मात्र मॉन्सूनची वाटचाल पुन्हा थबकली आहे. शनिवारी (ता. २७) मॉन्सूनची वाटचाल ‘जैसे थे’ होती. पुढील तीन ते चार दिवसांत उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेशचा आणखी काही भागासह, छत्तीसगड, झारखंड, बिहारचा उर्वरित भाग, तसेच उत्तर प्रदेशच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..शनिवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३४.३---२३.४अहिल्यानगर---३५.१---२३.७धुळे---३७---२०.६जळगाव---३५.७---२६जेऊर---३४.५---२०कोल्हापूर---३०.१--२२.९.महाबळेश्वर---२३.१---१७.३मालेगाव---३५.६---२३.६नाशिक---३४.१---२३.६निफाड---३६.१---२३.५सांगली---३१.६---२२.६सातारा---३३.७---२२.६सोलापूर---३५.२---२४.२सांताक्रूझ---३०.५---२४.५डहाणू---३५.२---२६.Maharashtra Rain Update: कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज.रत्नागिरी---३०.५---२४.५छत्रपती संभाजीनगर---३४.६---२३.३धाराशिव---३०.१---२१.४परभणी---३०.८---२४.५परभणी (कृषी)---३१---२३.६अकोला---३८.२---२६अमरावती---३४.४---२२.२भंडारा---३६---२४.बुलडाणा---३१.८---२४.८ब्रह्मपुरी---३५.८---२५चंद्रपूर---३६.२---२६.६गडचिरोली---३४.४---२६.४गोंदिया---३७---२५नागपूर---३६.४---२५वर्धा---३७---२५वाशीम---३२.४---२२.४यवतमाळ---३६.६---१९.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०.६---३७पश्चिम महाराष्ट्र---१७.३---३५.२मराठवाडा---२१.४---३४.६विदर्भ---१९---३८.२कोकण---२४.५---३५..जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :रायगड, रत्नागिरी.विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक घाटमाथा, पुणे, अहिल्यानगर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.