Weekly Weather: राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांत पावसाची शक्यता
Maharashtra Monsoon Forecast: महाराष्ट्रावर शनिवारपर्यंत (ता.१३) हवेचा दाब १००६ हेप्टापास्कल इतका कमी राहील. तसेच कोकण, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व सोलापूर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग वाढेल.