Maharashtra Monsoon Update: या आठवड्यात महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके कमी होत आहेत. जपान व फिलिपिन्स येथील हवामान संस्थांनी आय.ओ.डी. लवकरच पॉझिटिव्ह होईल असा दिलासादायक अंदाज व्यक्त केलेला आहे. या दोन्ही बाबी मॉन्सूनच्या पुनरागमनास अनुकूल ठरू शकतात. असे झाल्यास मॉन्सूनचे पुनरागमन या आठवड्यात अपेक्षित आहे. जसा ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असल्याचे अमेरिकास्थित ‘नोआ’ या संस्थेने जाहीर केले आहे, तसेच आय.ओ.डी. पॉझिटिव्ह झाल्यास तो एल निनोचा प्रभाव कमी करू शकतो ही बाब दिलासा देणारी आहे..यंदा मॉन्सून वेळेपूर्वी अंदमान समुद्रात दाखल झाला, मात्र पुढे केरळपर्यंत मजल मारण्यास चार दिवस विलंब झाला. त्यानंतर पुढे दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांपर्यंत तसेच सोलापूरपर्यंतही मॉन्सूनची प्रगती झाली. मात्र त्यापुढे प्रगती थांबली आणि मॉन्सूनचे ढग ‘इन्सॅट डी’च्या उपग्रहाच्या चित्रामध्ये देखील दिसणे बंद झाले..Monsoon Update 2026: २५ जूननंतर माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान.कोकणआज (ता.२१)पासून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत प्रति दिनी ७ मि.मी., रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५ मि.मी. आणि पालघर जिल्ह्यात ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा पालघर जिल्ह्यात नैॡत्येकडून, तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत वायव्येकडून राहण्यामुळे अद्याप मॉन्सूनच्या पावसाला अपेक्षित जोर नाही. रायगड व ठाणे जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी., तर रायगड जिल्ह्यात ताशी ६ कि.मी. आणि सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत ताशी ८ ते ९ कि.मी. राहील. .कमाल तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, रायगड जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस आणि ठाणे जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, पालघर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ राहील. तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६५ टक्के राहील..उत्तर महाराष्ट्रनाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात प्रति दिनी १ मि.मी. ते ३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून, तर जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात १७ कि.मी. तर नंदुरबार, जळगाव व धुळे जिल्ह्यांत ताशी २१ ते २३ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर नंदुरबार जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस आणि धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नाशिक व जळगाव जिल्ह्यांत ६२ ते ६७ टक्के, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ७१ ते ७८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३० ते ४० टक्के राहील..मराठवाडाया आठवड्यात धाराशिव व लातूर जिल्ह्यांत प्रतिदिनी ४ मि.मी., तर नांदेड व बीड जिल्ह्यांत ३ मि.मी., परभणी, जालना, हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत प्रतिदिनी २ मि.मी. पावसाची शक्यता आहे. या आठवड्यापासून पुढे पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहिल्यास पावसाचे प्रमाण कमी राण्याची शक्यता आहे. .वाऱ्याचा ताशी वेग नांदेड जिल्ह्यात ताशी १७ कि.मी., परभणी जिल्ह्यात ताशी २० कि.मी., हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी २१ कि.मी., धाराशिव जिल्ह्यात ताशी २२ कि.मी., लातूर जिल्ह्यात ताशी २४ कि.मी. तर बीड व जालना जिल्ह्यांत ताशी २५ कि.मी. इतका राहील. कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. बीड, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस राहील. .किमान तापमान नांदेड व बीड जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस, तर परभणी जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, लातूर व जालना जिल्ह्यांत २८ ते २९ अंश सेल्सिअस आणि हिंगोली जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना व हिंगोली जिल्ह्यांत ५० ते ५५ टक्के, तर बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ६२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २२ ते ३८ टक्के राहील..पश्चिम विदर्भबुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत प्रतिदिनी ६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहण्यामुळे पावसाचे प्रमाण कमी राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २५ ते २७ कि.मी. इतका अधिक राहील. बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ ते ३९ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वाशीम व बुलडाणा जिल्ह्यांत २५ ते २९ अंश सेल्सिअस, तर अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. वाशीम जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५१ ते ५५ टक्के, तर वाशीम जिल्ह्यात ७५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत २२ ते ३४ टक्के इतकी कमी राहील..Monsoon Update : मॉन्सून 'जैसे थे'; विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, काही भागात पावसाचा अंदाज.मध्य विदर्भयवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात प्रतिदिनी ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वर्धा व नागपूर जिल्ह्यात ताशी १८ कि.मी. आणि यवतमाळ जिल्ह्यात तो ताशी २१ कि.मी. राहील. यवतमाळ व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंश सेल्सिअस राहील, तर वर्धा जिल्ह्यात ते ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ सर्वच जिल्ह्यांत राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता नागपूर जिल्ह्यात ५४ टक्के, यवतमाळ जिल्ह्यात ७३ टक्के व वर्धा जिल्ह्यात ८० टक्के राहील, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ३५ टक्के राहील..पूर्व विदर्भचंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत प्रतिदिनी ७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग भंडारा जिल्ह्यात ताशी ५ कि.मी., तर गडचिरोली जिल्ह्यात ताशी ९ कि.मी. तर चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. राहील. .सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान गडचिरोली जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, भंडारा जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ५८ टक्के, तर गोंदिया जिल्ह्यात ६१ टक्के आणि गडचिरोली जिल्ह्यात ७४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ४१ ते ४८ टक्के राहील..पश्चिम महाराष्ट्रकोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर या जिल्ह्यात प्रतिदिनी ६ मि.मी. पावसाची शक्यता असून, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३ ते ४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. सांगली जिल्ह्यात ती पश्चिमेकडून राहील, तर सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ ते १३ कि.मी. राहील. .सांगली जिल्ह्यात तो ताशी १६ कि.मी. राहील. मात्र सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १९ ते २३ कि.मी. राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस राहील. सांगली जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील, अहिल्यानगर जिल्ह्यात ते ३६ अंश सेल्सिअस राहील आणि सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २३ ते २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५७ टक्के राहील.तर उर्वरित जिल्ह्यात ३३ ते ३७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत १३ ते २० टक्के इतकी कमी राहील..कृषी सल्लाहलक्या, उथळ जमिनीत मूग, उडीद, मटकी, चवळी, मध्यम-खोल ते भारी जमिनीत बाजरी अधिक तूर (३ः१) या पद्धतीने आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.फळभाज्यांची वांगी, टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची लागवडीसाठी गादीवाफ्यावर जमिनीत चांगली ओल झाल्यानंतर बियांची पेरणी करावी.चांगला पाऊस सुरू झाल्यानंतर फळबागेसाठी कलमांची लागवड करावी.चारा पिकांच्या लागवडीसाठी आफ्रिकन टॉल मक्याच्या जातीची निवड करावी.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.