Weather Advisory for Farmers: महाराष्ट्रावर आज (ता.११) व बुधवारी (ता.१४) हवेचे दाब १०१० हेप्टापास्कल इतके राहतील, तर उद्या (ता.१२) व मंगळवारी (ता.१३), त्यानंतर गुरुवार (ता.१५)पासून शनिवार (ता.१७)पर्यंत हवेचे दाब १०१२ हेप्टापास्कल इतके अधिक राहतील. त्या वेळी सकाळी थंड व दुपारी उष्ण व कोरडे हवामान राहील. या आठवड्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यांत अत्यल्प पावसाची शक्यता राहील. तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. महाराष्ट्रातून मॉन्सून परतला आहे..अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता नाही. तसेच आयओडी पॉझिटिव्ह होण्याचीही शक्यता दिसत नाही. मात्र प्रशांत महासागरात होन्डुरासजवळ समुद्राच्या पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान ३० अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. तेथे हवेचा दाब कमी असल्याने हिंदी महासागर आणि बंगालच्या उपसागरातून तयार होणारी बाष्पयुक्त हवा प्रशांत महासागराच्या दिशेने वाहून जात आहे. त्यामुळे भारताकडे कोरडे वारे वाहत आहेत. ‘एल निनो’चा प्रभाव वाढत असल्याने ईशान्य मोसमी पावसावरही परिणाम होण्याची शक्यता आहे..कोकणसिंधुदुर्ग जिल्ह्यात २ मि.मी., रत्नागिरी जिल्ह्यात २ मि.मी., तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत १ मि.मी. पावसाची शक्यता राहील. तर उर्वरित जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, रत्नागिरी जिल्ह्यात वायव्येकडून, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ताशी ३ कि.मी., ठाणे जिल्ह्यात ताशी ४ कि.मी., तर रायगड व पालघर जिल्ह्यांत ताशी ५ कि.मी. राहील. सिंधुदुर्ग रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांत कमाल तापमान ३५अंश सेल्सिअस, तर ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अधूनमधून अंशतः ढगाळ राहील. ठाणे व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७४ टक्के, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ८९ ते ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २७ ते ३३ टक्के, तर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ४७ ते ५२ टक्के राहील..Rain Update : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज; पश्चिम महाराष्ट्रात हलक्या सरी शक्य .उत्तर महाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक जिल्ह्यात ताशी ४ कि.मी., तर धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत ताशी २ ते ३ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ३७ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस राहील. नाशिक, जळगाव जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५३ ते ५८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २६ टक्के राहील..मराठवाडाधाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. परभणी व हिंगोली जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १ कि.मी., तर नांदेड जिल्ह्यात ताशी २ कि.मी. राहील. जालना, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांत ताशी ३ कि.मी., तर लातूर जिल्ह्यात ताशी ४ कि.मी. आणि धाराशिव जिल्ह्यात ताशी ६ कि.मी. राहील. कमाल तापमान लातूर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, तर धाराशिव, नांदेड, बीड, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. धाराशिव, लातूर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५२ ते ५८ टक्के, तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ६२ ते ६८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात २२ ते २६ टक्के राहील. दुपारी हवामान उष्ण व कोरडे राहील..Maharashtra Climate Update: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा कायम.पश्चिम विदर्भबुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. वाऱ्याचा ताशी वेग बुलडाणा जिल्ह्यात १ कि.मी., अमरावती जिल्ह्यात २ कि.मी., तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३ ते ४ कि.मी. राहील. कमाल तापमान अकोला जिल्ह्यात ३७ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते २६ टक्के राहील..मध्य विदर्भयवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत या आठवड्यात पावसाची शक्यता नाही. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग २ ते ४ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के इतकी कमी राहील..पूर्व विदर्भचंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान चंद्रपूर जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. गोंदिया जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७४ ते ७९ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ टक्के राहील..पश्चिम महाराष्ट्रकोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २ मिमी पावसाची शक्यता असून सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ४ कि.मी., तर सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत ताशी ६ कि.मी. राहील. कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. पुणे जिल्ह्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० टक्के राहील.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.