Maharashtra Climate Prediction: राज्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. आज (ता. ३०) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाड्यासह, कोकण घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. राज्यात जोरदार सरींची, तसेच तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानातील श्रीगंगानगरपासून भिवानी, ग्वालेर, सिधी, वादळी प्रणालीच्या केंद्र, पूरी ते मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. मध्य भारतात पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र सक्रिय आहे. यातच वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) मध्य भारताकडे सरकत असल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान होत आहे..बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी - अधिक होत आहे. कोकण, घाटमाथ्यावर पावसाच्या जोर कायम असल्याने सातारा जिल्ह्यातील कोयना नवजा येथे राज्यातील सर्वाधिक ३९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली..Vidarbha Rain Alert: विदर्भात वादळी पावसाची शक्यता.आज (ता. ३०) कोकणातील रायगड, मध्य महाराष्ट्रातील जळगाव, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, मध्य महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात जोरदार सरींची, तसेच उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..वादळी प्रणाली मध्य भारताकडे सरकलीछत्तीसगड आणि ओडिशा परिसरावर वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) सक्रिय आहे. ही प्रणाली छत्तीसगडच्या राजगढजवळ असून, चंपापासून ६० किलोमीटर आग्नेयेकडे, विलासपूरपासून १२० किलोमीटर पूर्वेकडे, ओडिशाच्या संभळपूरपासून ८० किलोमीटर वायव्येकडे होती. ही प्रणाली आज (ता. ३०) छत्तीसगड आणि मध्य प्रदेशकडे परिसराकडे सरकण्याची शक्यता आहे..बुधवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२८.२---२२.७अहिल्यानगर---२९.०---२४.८धुळे---३१.०---२१.२जळगाव---३१.८---२३.७जेऊर---३१.५---२३.०कोल्हापूर---२५.१---२२.७महाबळेश्वर---१९.८---१८.६मालेगाव---३१.२---२२.२नाशिक---२७.३---२२.७.EL Nino 2026 : एल निनो आणखी तीव्र होणार; ऑस्ट्रेलियन हवामान विभागाचा इशारा.निफाड---२८.७---२२.९सांगली---२६.६---२२.७सातारा---२७.८---२२.८सोलापूर---३३.०---२४.१सांताक्रूझ---३१.६---२७.४डहाणू---३२.७---२५.८रत्नागिरी---२९.८---२५.८छत्रपती संभाजीनगर---२९.२---२३.४.धाराशिव---२८.२---२०.०परभणी---३१.१---२३.७परभणी (कृषी)---३१.२---२२.७अकोला---२९.३---२५.१अमरावती---२७.४---२३.९ब्रह्मपूरी---२७.८---२३.०बुलडाणा---२८.०---२२.८चंद्रपूर---२९.०---२५.०.गडचिरोली---२९.०---२४.०गोंदिया---३२.२---२२.४नागपूर---३०.४---२१.८वर्धा---२९.५---२४.४वाशीम---२७.६---२१.६यवतमाळ---३१.६---२१.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२१.२---३१.८पश्चिम महाराष्ट्र---१८.६---३३.०कोकण---२५.८---३२.७मराठवाडा---२०.०---३१.२विदर्भ---२१.०---३२.२.जोरदार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) : रायगड, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, बीड, परभणी, हिंगोली.वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : पालघर, नंदूरबार, अहिल्यानगर, पुणे, सातारा, लातूर, नांदेड, बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.