Maharashtr Rain Season Update: कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर कायम राहणार असल्याने अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे. आज (ता. ५) कोकण, घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. दक्षिण कोकण, सातारा, नाशिकचा घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..हंगामी कमी दाबाचा पट्टा राजस्थानपासून बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत कायम आहे. गुजरात आणि कर्नाटकच्या किनाऱ्यालगत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर परस्पर विरोधी वाऱ्यांचे जोड क्षेत्र कायम आहे..शनिवारी (ता. ४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३१.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १८.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. कोकण घाटमाथ्यासह राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वर येथे राज्यातील उच्चांकी २७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. उर्वरित राज्यात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत..Rain Update: राज्यात ४ जिल्ह्यांना रेड अलर्ट, तर ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढणार.आज (ता. ५) पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा, सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची, तसेच अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया येथे विजांसह जोरदार पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..कमी दाब क्षेत्र झाले ठळकउत्तर ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र शनिवारी (ता. ५) ठळक झाले आहे. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ९.४ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. ही प्रणाली उत्तर ओडिशा, छत्तीसगडकडे सरकण्याची शक्यता आहे..शनिवारी (ता. ४) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२६.७---२२.७अहिल्यानगर---२९.०---२३.५धुळे---३०.६---२०.६जळगाव---३०.२---२३.२जेऊर---३०.५---१९.५कोल्हापूर---२६.५--२१.९महाबळेश्वर---२०.१---१८.६.Maharashtra Heavy Rain: राज्यात २०८ मंडलांत अतिवृष्टी.नाशिक---२५.२---२२.५निफाड---२८.८---२२.६सांगली---२८.०---२२.१सातारा---२४.६---२२.०सोलापूर---३१.२---२३.७सांताक्रूझ---२७.१---२३.५डहाणू---२८.४---२३.५रत्नागिरी---२९.५---२४.६.छत्रपती संभाजीनगर---२८.७---२२.४धाराशिव---निरंक---२१.०परभणी---३०.८---२३.४परभणी (कृषी)---२९.७---२२.८अकोला---२९.१---२४.३अमरावती---२८.०---२३.१भंडारा---निरंक---२३.०बुलडाणा---२७.६---२२.५.ब्रह्मपुरी---२८.६---२३.४चंद्रपूर---२९.०---२४.४गडचिरोली---२९.४---२३.६गोंदिया---२६.९---२२.२नागपूर---२९.२---२३.५वर्धा---२९.१---२४.५वाशीम---२८.०---२१.०यवतमाळ---२९.०---१९.२.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०.६---३०.६पश्चिम महाराष्ट्र---१८.६---३१.२मराठवाडा---२१.०---३०.८विदर्भ---१९.२---२९.४कोकण---२४.६---२९.५.मुसळधार पावसाचा इशारा. (रेड अलर्ट)पालघर, मुंबई, ठाणे, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा.अतिजोरदार पावसाचा इशारा. (ऑरेंज अलर्ट)रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया.विजांसह जोरदार पावसाची शक्यता. (ऑरेंज अलर्ट)अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया.जोरदार पावसाचा इशारा. (येलो अलर्ट)नंदुरबार, जळगाव, नाशिक, हिंगोली.विजांसह वादळी पावसाचा इशारा. (येलो अलर्ट)छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बुलडाणा, अकोला, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.