Maharashtra Climate Update:उन्हाच्या झळांमुळे होरपळ होत असतानाच, पूर्वमोसमी वादळी पावसाने काही ठिकाणी दिलासा मिळत आहे. आज (ता. १५) मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा, कोकणात उष्ण व दमट हवामानाचा, तर दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. .गुरुवारी (ता. १४) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील जैसलमेर येथे देशातील उच्चांकी ४६.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नैॡत्य बंगालच्या उपसागरात गुरुवारी (ता. १४) ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते. त्याला लागून समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती होती. मध्य प्रदेशापासून मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे.Maharashtra Rain Update: विदर्भात गारपीटीची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा.गुरुवारी (ता.१४) सकाळपर्यंतच्या २४ तासांत अकोला राज्यातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. जळगाव, वर्धा आणि अमरावती येथे ४५ अंशांपेक्षा अधिक, धुळे येथे ४४ अंश सेल्सिअस, तर मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, ब्रह्मपुरी येथे ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. यातच जेऊर येथे राज्यातील नीचांकी २० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..आज (ता. १५) मराठवाड्यातील छत्रपती छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता आहे. तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे. .Maharashtra Rain Update : राज्यात ढगाळ हवामान; तापमानात चढ-उतार सुरूच.यातच सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामान, विजांसह पाऊस आणि उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे : अकोला ४५.९, अमरावती ४५.८, जळगाव ४५.६, वर्धा ४५..मॉन्सून उद्या अंदमानातनैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) अंदमानातील आगमनासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे. विषुववृत्तीय हिंद महासागर आणि दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्रात ढगांची रेलचेल वाढली आहे. उद्यापर्यंत (ता. १६) अंदमान - निकोबार बेटांवर मॉन्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.