Maharashtra Climate Update: राज्यात सूर्य तळपू लागल्याने राज्यात उन्हाचा वाढला आहे. उन्हाच्या झळांनी होरपळ वाढली आहे. राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. आज (ता. १४) राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..बुधवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील बारमेर येथे देशातील उच्चांकी ४७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला राज्यातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले. जळगाव आणि अमरावती येथे ४५ अंशापेक्षा अधिक तर धुळे, वर्धा येथे ४४ अंश सेल्सिअस, तसेच मालेगाव, निफाड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बुलडाणा, ब्रह्मपुरी, वाशीम, नागपूर येथे ४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली..कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेला असेल आणि तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाली असेल तर उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. त्यानुसार सातारा येथे उष्णतेची लाट आली होती. उर्वरित राज्यात उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती आहे. तर जेऊर येथे राज्यातील नीचांकी २१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Maharashtra Rain Update: विदर्भात गारपीटीची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा.आज (ता. १४) उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड आणि विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवली आहे..बुधवारी (ता. १३) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३९.०---२७.४अहिल्यानगर---४३---२७.४धुळे---४४.४---२३.८जळगाव---४५.५---२९जेऊर---४२---२१कोल्हापूर---३८.७--२५.८महाबळेश्वर---३२.६---२१.५.मालेगाव---४३.८---२८.८नाशिक---४१.२---२५निफाड---४३---२५.३सांगली---४०.४---२६सातारा---४१.७---२६.२सोलापूर---४१.८---२८.५सांताक्रूझ---३४.४---२८.६डहाणू---३६.४---२७रत्नागिरी---३४.१---२६.८.Monsoon Forecast: आता तालुकास्तरीय मॉन्सून आगमनाचा अंदाज.छत्रपती संभाजीनगर---४३.६---२८.८धाराशिव---४०.८---२६.६परभणी---४३.१---२९.८परभणी (कृषी)---४२.२---२५.९अकोला---४५.६---३२.५अमरावती---४५.४---३०.१भंडारा---४२---२६बुलडाणा---४३.५---३०.ब्रह्मपुरी---४३.५---२७.६चंद्रपूर---४२.२---२८गडचिरोली---४१.४---२८गोंदिया---४०.९---२७.४नागपूर---४३---२८.४वर्धा---४४.२---३१.५वाशीम---४३.४---२८.४यवतमाळ---४१.८---२६.२.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२३.८---४५.५पश्चिम महाराष्ट्र---२१---४२मराठवाडा---२५.९---४३.६विदर्भ---२६---४५.६कोकण---२६.८---३६.४.उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, वर्धा.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :अकोला ४५.६, जळगाव ४५.५, अमरावती ४५.४, धुळे ४४.४, वर्धा ४४.२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.