Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रावर आज व उद्या (ता. २६ व २७) हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके मध्यम स्वरूपाचे राहतील, असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. मंगळवार (ता. २८)पासून शनिवार (ता. १ ऑगस्ट)पर्यंत उत्तरेकडील भागावर १००६ व दक्षिणेकडील भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळेच या आठवड्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील.महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. मात्र नैॡत्य मॉन्सूनच्या पावसाला अपेक्षित जोर अद्याप नाही. हवेचे दाब वाढण्यामुळे बहुतांशी जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता राहील..पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये तसेच विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग वाढेल. वारे ताशी १५ ते २१ कि.मी. इतक्या वेगाने वाहतील. यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढून जमिनीतील ओलावा कमी होईल. सर्वच जिल्ह्यांत हवामान अंशतः ढगाळ राहील. पावसाचे प्रमाण कमी राहून हलक्या ते मध्यम स्वरूपात पावसाचे वितरण होईल..एन.ओ.ए.ए. या अमेरिकेतील हवामान संस्थेने ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ‘एल निनो’चा प्रभाव वाढेल आणि पुढे ‘सुपर एल निनो’ची स्थिती येईल असा अंदाज दिलेला आहे. म्हणजेच पावसाचे प्रमाण भारतात कमी असेल असा त्यांचा अंदाज आहे. मात्र भारतीय हवामान शास्त्र विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यांत ‘आयओडी’ पॉझिटिव्ह होऊन एल निनोचा प्रभाव कमी जाणवेल. आणि देशात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत चांगल्या पावसाची शक्यता वर्तविली आहे. तसेच अटलांटिक महासागराचे तापमान थंड होईल आणि ‘ला निना’ स्थिती निर्माण होऊन देशात पावसाचे प्रमाणात ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत चांगले राहील असाही अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तविला आहे. या सर्व अंदाजाचा आढावा घेतल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता असल्याचे लक्षात येते. मात्र सद्यःस्थिती पाहता पावसात खंड राहणे शक्य आहे..Rain Update: पश्चिम विदर्भात पाऊस ओसरला.कोकणभारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवार (ता.२६) ते बुधवार (ता.२९) या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ ते ४३ मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ४० ते ५० मिमी, रायगड जिल्ह्यात ३८ ते ४७ मिमी, ठाणे जिल्ह्यात ३५ ते ४८ मिमी, पालघर जिल्ह्यात २३ ते ४० मिमी पावसाची शक्यता राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे व रायगड जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ११ ते १३ कि.मी. राहील. पालघर जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ कि.मी. राहील. सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस, तर ठाणे व रायगड जिल्ह्यात ३० ते ३१ अंश सेल्सिअस राहील. रत्नागिरी जिल्ह्यात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात हवामान अंशतः ढगाळ राहील. सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के, तर रत्नागिरी, रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ८० ते ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यांत ११ ते १६ टक्के राहील..उत्तर महाराष्ट्रनाशिक, धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. भारतीय हवामान शास्त्र विभागाने रविवार (ता.२६) ते बुधवार (ता.२९) या काळात नाशिक जिल्ह्यात ७ ते ११ मिमी, धुळे जिल्ह्यात ३ ते ६ मिमी, नंदुरबार जिल्ह्यात ५ ते १० मिमी, जळगाव जिल्ह्यात ४ ते ७ मिमी पावसाची शक्यता राहील. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग जळगाव जिल्ह्यात १४ कि.मी., धुळे जिल्ह्यात ताशी १७ कि.मी., नंदुरबार जिल्ह्यात ताशी १९ कि.मी. आणि नाशिक जिल्ह्यात ताशी २१ कि.मी. राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, नंदुरबार जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३१ ते ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६५ टक्के राहील..मराठवाडारविवार (ता.२६) ते बुधवार (ता.२९) या काळात धाराशिव जिल्ह्यात २ ते ७ मिमी, लातूर जिल्ह्यात २ ते ४ मिमी, नांदेड जिल्ह्यात २ ते ६ मिमी, बीड जिल्ह्यात २ ते ५ मिमी, परभणी जिल्ह्यात ३ ते ६ मिमी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत २ ते ७ मिमी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ३ ते ८ मिमी इतक्या हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग अधिक राहील. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ताशी १६ कि.मी., तर लातूर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १७ कि.मी., जालना व धाराशिव जिल्ह्यांत ताशी १८ कि.मी. आणि बीड जिल्ह्यात ताशी १९ कि.मी. राहील. कमाल तापमान धाराशिव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड, जालना जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. धाराशिव, लातूर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. तर परभणी व हिंगोली जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस आणि नांदेड जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. धाराशिव, लातूर, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ८२ टक्के, तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत ७६ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ५१ ते ५९ टक्के राहील..Heavy Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींचा इशारा.पश्चिम विदर्भरविवार (ता.२६) ते बुधवार (ता.२९) या काळात बुलडाणा, अकोला जिल्ह्यात ३ ते ८ मिमी, वाशीम जिल्ह्यात ३ ते ७ मिमी, अमरावती जिल्ह्यात ४ ते ८ मिमी पावसाची शक्यता राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला व अमरावती जिल्ह्यांत ताशी १४ ते १५ कि.मी., तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत १६ कि.मी. राहील. वाशीम व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा व अकोला जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के आणि दुपारची सापेक्ष आर्द्रता ५५ टक्के राहील..मध्य विदर्भरविवार (ता.२६) ते बुधवार (ता.२९) या काळात यवतमाळ जिल्ह्यात २ ते ६ मिमी, वर्धा जिल्ह्यात ५ ते ८ मिमी, नागपूर जिल्ह्यात ४ ते ९ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १५ कि.मी राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ७८ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ८५ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता यवतमाळ जिल्ह्यात ५४ टक्के, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ६२ टक्के राहील..पूर्व विदर्भरविवार (ता.२६) ते बुधवार (ता.२९) या काळात चंद्रपूर जिल्ह्यात ५ ते १० मिमी, गडचिरोली जिल्ह्यात ६ ते १८ मिमी, भंडारा जिल्ह्यात ६ ते १५ मिमी, गोंदिया जिल्ह्यात ७ ते १५ मिमी पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग गोंदिया जिल्ह्यात ताशी १२ कि.मी., गडचिरोली जिल्ह्यात ताशी ८ कि.मी., तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांत ताशी १४ कि.मी. राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर जिल्ह्यात ८४ टक्के, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ९० ते ९२ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ६८ टक्के, तर गोंदिया जिल्ह्यात ७० टक्के राहील..पश्चिम महाराष्ट्ररविवार (ता.२६) ते बुधवार (ता.२९) या काळात कोल्हापूर जिल्ह्यात १२ ते १७ मिमी, सांगली जिल्ह्यात ५ ते ८ मिमी, सातारा जिल्ह्यात ९ ते १३ मिमी, सोलापूर जिल्ह्यात २ ते ५ मिमी, पुणे जिल्ह्यात ११ ते १३ मिमी, अहिल्यानगर जिल्ह्यात ४ ते ८ मिमी इतक्या पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. कोल्हापूर, सोलापूर, पुणे या जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १८ कि.मी., तर सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत ताशी १९ कि.मी आणि सांगली जिल्ह्यात ताशी २२ कि.मी. राहील. कमाल तापमान अहिल्यानगर व कोल्हापूर जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान पुणे व सांगली जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर सांगली, सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८० ते ९० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील..कृषी सल्लाभात खाचरात २ ते ३ इंच पाणीपातळी राखावी.योग्य आकाराच्या खड्ड्यात फळझाडांची रोपे सरळ उभी लावावीत.अद्याप पेरणी न झालेल्या ठिकाणी जमिनीत २ ते ३ फूट खोलीपर्यंत ओल असल्यास पेरणी करून घ्यावी.पेरणी केलेल्या क्षेत्रात चांगली उगवण झाले असेल आवश्यकतेनुसार विरळणी व नांगे भरणेचे काम करावे.जनावरांना रोग प्रतिबंधक लसीकरण करावे.(ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.