IMD Weather Forecast: महाराष्ट्रावर आज (ता.२) हवेचा दाब १००४ हेप्टापास्कल इतका राहील. त्यानुसार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. मात्र उद्या (ता.३)पासून शनिवारपर्यंत (ता. ८) महाराष्ट्रावर १००६ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. तेव्हा हलक्या पावसाची शक्यता राहील.