Maharashtra Rain Alert: राज्यात कमीअधिक पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून कोकण, घाटमाथा आणि सह्याद्रीच्या रांगांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसदृश पाऊस झाला आहे. कोकणात काही ठिकाणी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचे वितरण असमान राहिल्याने खरीप पेरण्यांवर परिणाम दिसून येत आहे. विदर्भात ठिकठिकाणी समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामाला काहीसा दिलासा मिळाला आहे..बुधवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या रायगड जिल्ह्यातील भिरा येथे सर्वाधिक २४९ मिलिमीटर पाऊस पडला. तर कोकणातील वाडा येथे २०१ मिलिमीटरची नोंद झाली. या दोन्ही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत.कोकणात ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत सर्वत्र पावसाचा जोर कायम राहिला. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून काही भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे..घाटमाथ्यावर भिरा, ताम्हिणी, डुंगरवाडी आणि लोणावळा परिसरात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. कोयना पाणलोट क्षेत्रातही संततधार सुरू असल्याने कोयना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत असून धरणात पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे..Rain In Maharashtra: विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम; उर्वरित राज्यातही वादळी पावसाचा अंदाज.मध्य महाराष्ट्रात मात्र पावसाचे वितरण असमान राहिले. पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, जुन्नर आणि आंबेगाव भागात हलका ते मध्यम पाऊस झाला, तर शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर भागात पावसाचा अभाव राहिल्याने खरीप पेरण्या मंदावल्या आहेत. सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार भागात पावसाच्या अधूनमधून सरी बरसल्याने अजून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत..मराठवाड्यात काही भागांत जोरदार तर काही ठिकाणी हलका पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात सरासरी १४.३० मिलिमीटर पाऊस झाला आहे. अर्धापूर मंडलात ७७.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हिंगोली जिल्ह्यात नरसी नामदेव येथे ७७.८ तर अंबा येथे ६५ मिलिमीटर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यात आडगाव मंडलात अतिवृष्टी नोंदली गेली आहे..Super El Nino 2026 : सुपर एल निनोचा धोका वाढला; ऑस्ट्रेलियाच्या हवामान विभागाचा इशारा.sविदर्भातही पावसाचा जोर कायम राहिला. गोंदिया जिल्ह्यात ८९.८ मिलिमीटर पाऊस पडला असून गडचिरोली, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. काही भागांत शेतजमिनी ओलसर झाल्याने पेरणीसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे..बुधवारी (ता. १) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला तालुकानिहाय पाऊस, मिलिमीटरमध्ये :घाटमाथा : भिरा २४९, डुंगरवाडी १४०, ताम्हिणी १२०, धारावी १११, शिरगाव ११०, कोयना (पोफळी) ९९, लोणावळा ७४..कोकण : ठाणे १०९, कल्याण ९२, भिवंडी १६६, शहापूर ८५, उल्हासनगर ११९, अंबरनाथ ७७, अलिबाग १११, पनवेल ८४, खालापूर ६३, उरण ९२, सुधागड ९०, पेण ८८, महाड १०८, मानगाव १०६, रोहा १५२, पोलादपूर १०२, मुरूड १५७, श्रीवर्धन १५४, म्हसळा १२१, तळा १५५, चिपळून १००, दापोली १२०, खेड १०६, गुहागर ११२, मंडनगड १४६, रत्नागिरी ९४, संगमेश्वर ९९, राजापूर १०४, लांजा ८५, देगवड ११२, मालवण १००, सावंतवाडी ९९, वेंगुर्ला ९२, कणकवली ११३, कुडाळ ११७, वैभववाडी ७७, दोडामार्ग १२४, वाडा २०१, डहाणू १२९, पालघर ८७, जव्हार ८३, मोखाडा ७४, तलासरी १८८, विक्रमगड १५८..पाऊस दृष्टिक्षेपात- कोकणातील वाडा येथे सर्वाधिक २०१ मिलिमीटर.- कोयना पाणलोट क्षेत्रात पावसामुळे धरण साठ्यात वाढ.- मराठवाड्यात काही मंडलांत अतिवृष्टी, काही ठिकाणी पेरणीयोग्य पाऊस.- मध्य महाराष्ट्रात असमान पाऊस; शेतकऱ्यांची दमदार पावसाची प्रतीक्षा.- विदर्भात पूर्व भागात अधिक पाऊस, पश्चिम भागात हलका ते मध्यम पाऊस.- अनेक नद्या-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.