Maharashtra Rain: कोकणासह घाटमाथ्यावर दमदार सरींची शक्यता
Weather Forecast: राज्यात अनेक भागांत पावसाचा जोर ओसरला असला तरी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर पावसाच्या सरी कायम आहेत. आज (ता. ७) पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाच्या सरींची शक्यता असून, जळगाव जिल्ह्यात विजांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.