Rain Forecast: राज्यात उन्हाचा चटका वाढत असतानाच, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यात विजांसह पावसाला पोषक हवामान होत आहे. आज (ता. १०) कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढणार आहे. .ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, त्यापासून मन्नार आखातापर्यंत वाऱ्यांचे प्रवाह खंडित झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यातील पूर्व मोसमी पावसाने उघडीप देताच, राज्याच्या कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे..Maharashtra Weather Forecast: कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा.दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे असह्य होत असतानाच, सायंकाळनंतर काहीसा थंडावा, असे चित्र कायम आहे. गुरूवारी (ता. ९) वाशीम आणि अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १७.० अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Maharashtra Weather Forecast: राज्याच्या किमान तापमानात वाढ शक्य.आज (ता. १०) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..तसेच सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पावसाला पोषक हवामान आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याची शक्यता आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.