Pune News: राज्यात उन्हाच्या झळा वाढल्याने विदर्भातील अकोला येथे उष्णतेची लाट कायम आहे. अकोला येथे देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद होत आहे. आज (ता. १०) कोकण, विदर्भात उष्ण लाटेचा, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..बिहारपासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. सोमवारी (ता. ९) मध्य प्रदेशातील रायगड येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तर सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे देशातील उच्चांकी ४०.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..कमाल तापमान ४० अंशापार गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांपेक्षा अधिक वाढ झाल्यास उष्णतेची लाट आल्याचे समजले जाते. सोमवारी (ता. ९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे उष्णतेची लाट होती. सोलापूर येथे पारा ४० अंशावर होता. तर वाशीम, वर्धा, अमरावती आणि ब्रह्मपुरी येथे ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी ११.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Rain Alert: राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज.आज (ता. १०) कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा येथे उष्ण लाटेची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..सोमवारी (ता. ९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३७.१---१५.४अहिल्यानगर---निरंक---१४.५धुळे---३८.०---१३.०जळगाव---३८.५---१५.२जेऊर---३७.५---१५.५कोल्हापूर---३६.८--२१.९महाबळेश्वर---३०.५---१९.४.Maharashtra Weather: अकोला, अमरावतीत उष्णतेची लाट.मालेगाव---३७.८---१७.२नाशिक---३७.१---१५.२निफाड---३६.८---११.४सांगली---३८.४---२०.८सातारा---३७.४---१७.३सोलापूर---४०.२---२०.४सांताक्रूझ---३५.८---२१.३डहाणू---३४.३---२१.७रत्नागिरी---३४.२---२३.७.छत्रपती संभाजीनगर---३८.०---२०.०धाराशिव---३७.८---२०.२परभणी---३८.४---१८.४परभणी (कृषी)---३७.२---१३.०अकोला---४०.९---१९.१अमरावती---३९.२---१९.९भंडारा---३५.०---२०.०बुलडाणा---३८.०---२१.०ब्रह्मपुरी---३९.०---२०.७.चंद्रपूर---३८.४---२१.२गडचिरोली---३७.६---१८.६गोंदिया---३६.४---१८.२नागपूर---३७.६---१८.६वर्धा---३९.२---२०.०वाशीम---३९.६---१७.६यवतमाळ---३८.०---निरंक.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---११.४---३८.५पश्चिम महाराष्ट्र---१५.५---४०.२मराठवाडा---१३.०---३८.४विदर्भ---१७.६---४०.९कोकण---२१.३---३५.८.उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, अकोला, अमरावती, वर्धा.उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :रत्नागिरी, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी बीड.राज्यात उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :अकोला ४०.९, सोलापूर ४०.२, वाशीम ३९.६, वर्धा ३९.२, अमरावती ३९.२, ब्रह्मपुरी ३९..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.