Maharashtra Weather Alert: राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत असतानाच पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. आज (ता. १७) राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता आहे. कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज आहे, तर पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि दक्षिण मराठवाड्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत ३.१ ते ४.५ किलोमीटर उंची दरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून दक्षिण तामिळनाडू पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. आग्येय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे..राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहेत. अनेक ठिकाणी पारा सातत्याने ३५ अंशांच्या वर आहे. शुक्रवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ३८.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. रत्नागिरी येथे ३८ अंशांपेक्षा अधिक, सांताक्रूझ येथे ३७ अंशापेक्षा अधिक, सोलापूर, धुळे, जळगाव, अमरावती आणि चंद्रपूर येथे ३६ अंशांपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..October Rain: वादळी पावसाचा काही ठिकाणी अंदाज; मराठवाडा, विदर्भातील कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यता?.आज (ता. १७) कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढून दमट हवामानाची शक्यता असल्याने, तसेच सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. रत्नागिरी, पुणे, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता आहे, तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..शनिवारी (ता. १७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३४.४---१८.९अहिल्यानगर---निरंक---२३.३धुळे---३६.६---१६.६जळगाव---३६---१८.४जेऊर---३५.५---२०.०कोल्हापूर---३३.७---२३.१महाबळेश्वर---२७.६---१८.१.मालेगाव---३५.०---१९.५नाशिक---३४.३---१८.२निफाड---३५.६---१६.०सांगली---३५.०---२०.९सातारा---३५.५---१८.८सोलापूर---३६.९---२३.२सांताक्रूझ---३७.९---२४.४डहाणू---३५.८---२३.४रत्नागिरी---३८.८---२३.६छत्रपती संभाजीनगर---३५.५---१९.८.Monsoon Withdrawal: मॉन्सूनची देशातून माघार.धाराशिव---३४.८---२०.९परभणी---३४.७---१९.६परभणी (कृषी)---३४---१७.२अकोला---३५.६---२१.४अमरावती---३६.४---२१.५ब्रह्मपूरी---३४.१---२४बुलडाणा---३४.६---२१.चंद्रपूर---३६.२---२४.६गडचिरोली---३३.६--२२गोंदिया---३३.८---१९.५नागपूर---३४---२१वर्धा---३५---२१.४वाशीम---३४---१९यवतमाळ---३८.६---२२.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१६ --३६.६पश्चिम महाराष्ट्र---१८.१---३६.९कोकण---२३.४--३८.८मराठवाडा---१७.२---३५.५विदर्भ---१९---३८.६.उष्ण व दमट हवामानाची शक्यता (येलो अलर्ट) : ठाणे, मुंबई, रायगड.विजांसह वादळी पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव.विजांसह पावसाची शक्यता : रत्नागिरी, पुणे, लातूर, नांदेड.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये) :रत्नागिरी ३८.८, यवतमाळ ३८.६, सांताक्रूझ ३७.९, सोलापूर ३६.९, धुळे ३६.६, अमरावती ३६.४, चंद्रपूर ३६.२, जळगाव ३६..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.