Maharashtra Weather Update: जून महिन्यात कमी पाऊस झाल्यानंतर शेतकरी जुलै महिन्यातील पावसाकडे डोळे लावून होते. पण जुलै महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यात विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर भागातही पाऊस कमीच राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. .भारतीय हवामान विभागाने आज (ता.३०) देशातील जुलै महिन्याच्या पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. देशात यंदा माॅन्सूनचे आगमन ३ दिवसाने उशीरा होऊन माॅन्सून ४ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा ३९.८ टक्के कमी पाऊस झाला आहे. महाराष्ट्रात सरासरीपेक्षा ४७ टक्के कमी पाऊस पडला आहे..Rain Update: मॉन्सूनचा प्रवास पुन्हा सुरु; कोकण, विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट.मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, केरळ, ओडिशा, बिहार, झारखंड, हरियाना, पंजाब या राज्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. केवळ आंध्र प्रदेश, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये सरासरी पाऊस पडला. गुजरात आणि छत्तीसगड राज्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. गुजरातमध्ये सरासरीपेक्षा तब्बल ८२ टक्के तर छत्तीसगड राज्यात सरासरीपेक्षा ६५ टक्के कमी पाऊस झाला आहे. .जुलै महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. देशातील वायव्य आणि ईशान्य भागात तसेच पूर्व मध्य भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. देशाच्या इतर भागात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. .Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम.पॅसिफिक महासागरात सध्या एल निनो स्थिती सक्रिय झाली आहे. अनेक जागतिक संस्थांनी माॅन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात सकारात्मक आयओडी स्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे. पण भारतीय हवामान विभागाने माॅन्सून काळात आयओडी स्थिती तटस्थ राहण्याची शक्यता वर्तविली आहे. आयओडी सकारात्मक झाल्यास एल निनोचा प्रभाव काहीसा कमी होऊन पावसाला पोषक स्थिती निर्माण होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. .विदर्भात सरासरी पावसाचा अंदाजजुलै महिन्यात राज्यातील इतर भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर विदर्भाच्या शेजारील मराठवाड्याच्या काही भागातही सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्याचा इतर भाग, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.