Maharashtra Weather: महाराष्ट्रावर आजपासून मंगळवार (ता.११ ते १३) पर्यंत १०१४ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. मात्र महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमारेषेजवळ १०१६ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे महाराष्ट्राच्या उत्तर भागातील किमान तापमान जैसे थे राहील.