ठळक मुद्देराज्यातील १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टीजळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिककोकणात जोरदार पावसाची शक्यता.Maharashtra Weather Update : राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कायम आहे. मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १३ जिल्ह्यांतील ८१ मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील जांभूळ मंडळात सर्वाधिक १७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..जळगाव, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांतील अधिक भागात अतिवृष्टी झाली आहे..Monsoon Rain Forecast: पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पुढील ४ दिवस पावसाचा अंदाज.या मंडळात अतिवृष्टीसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील वालावल, जळगाव जिल्ह्याच्या जामनेर तालुक्यातील जामनेर, नेरी, वाकडी, शेंदुर्णी, तोंडापूर, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव, वरखेडी, नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील टाकळी, पालशी, पाथर्डी तालुक्यातील पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, खरवंडी, श्रीरामपूर तालुक्याच्या श्रीरामपूर, बेलापूर, टाकळीभान, कारेगाव या मंडळात अतिवृष्टी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील पैठण, गंगापूर तालुक्यातील मांजरी, हरसूल, सिद्धनाथ, गजगाव, जामगाव, खुलताबाद तालुक्यातील वेरूळ, सोयगाव तालुक्यातील सोयगाव, जरंडी, जालना जिल्ह्याच्या जाफराबाद तालुक्यातील वरुड, जालना तालुक्यातील जालना-शहर, जालना-ग्रामीण, शेवळी, रामनगर, पाचवडगाव, अंबड तालुक्यातील अंबड, गोंधळी, वडीगोद्री, सुखापूर, परतूर तालुक्यातील परतूर, घनसांगवी तालुक्यातील तिर्थपुरी, पिंपळगाव, अंतरवली, जांबसमर्थ, मांजरसुंबा, लिंबगणेश, चऱ्हाटा, पारगाव सिरस, पाटोदा तालुक्यातील अमळनेर, आष्टी तालुक्यातील डोईठाण, गेवराई तालुक्यातील धोंडराई, माजलगाव तालुक्यातील गंगामसला, किट्टीआडगाव, शिरूर कासार तालुक्यातील गोमळवाडा, नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यातील जाळधरा, हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील पेठ, देऊळगाव राजा तालुक्यातील तुळीजापुर, अंढेरा, सिंदखेड राजा तालुक्यातील सिंखेड, किनगाव, दुसरबीड, मलकापूर तालुक्यातील नरवेल, धरणगाव, जांभूळ, मोताळा तालुक्यातील शेलापूर, अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर, वाशिम जिल्ह्याच्या वाशिम तालुक्यातील वाशिम, नागठाणा, कोंढाळा, मालेगाव तालुक्यातील शिरपूर, कारंजी, मंगरुळपीर तालुक्यातील पोटी, भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील आमगाव, चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर, आंबोली आणि गडचिरोली जिल्ह्यातील वायरागड येथे अतिवृष्टीची नोंद झाली आहे..Maharashtra Rain Alert: राज्यात जोरदार पावसाचा इशारा.कोकणात जोरदार पावसाची शक्यतादरम्यान, पालघर, ठाणे, मुंबईत पुढील ४ दिवस मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील दोन दिवसांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने वर्तवली आहे..आज, मॉन्सून राजस्थानचा काही भाग, गुजरात, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागातून भागातून मागे परतला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.