Chhatrapati Sambhajinagar News: मराठवाड्यातील नांदेड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, धाराशिव, हिंगोली या जिल्ह्यांत अतिवृष्टीने थैमान घातले आहे. मराठवाड्यातील तब्बल १३० मंडलांत गुरुवारी (ता.२८) अतिवृष्टी झाली. पावसामुळे शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून, उभी पिके पाण्याखाली गेल्याने मोठी हानी झाली. नांदेडमध्ये १३२.७ मिलिमीटर, तर लातूरमध्ये ९१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. .गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४, बीडमधील १६, लातूरमधील ३६, नांदेडमधील सर्वाधिक ६९, धाराशिव व परभणीतील प्रत्येकी एक, तर हिंगोलीतील तीन मंडलांत अतिवृष्टी झाली..नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल, एसडीआरएफ, सीआरपीएफ, नांदेड मनपा व स्थानिक शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून शोध व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.‘‘पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. सर्व यंत्रणासोबत संपर्क व समन्वय ठेवून जिल्हा प्रशासनाची कार्यवाही सुरू आहे.या परिस्थितीत नागरिकांनी अति आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये,’’ असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे..Nanded Heavy Rain: नांदेडला पुन्हा मुसळधार पाऊस.नांदेडला तीन जणांचा मृत्यूअतिवृष्टी झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील तीन तलाव फुटल्याने शेती पिकांचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला असून, एक जण बेपत्ता असून, त्याचा शोध सुरू आहे..लातूर जिल्ह्यात पशुधन दगावलेहाळी (ता. उदगीर) येथील खाजामैनोद्दीन तांबोळी यांच्या गोठ्यात पाणी घुसून दोन गाभण म्हशी व देवणी जातीच्या एक गाय मृत पावली. गुत्ती (ता. जळकोट) येथील हुलाजी केंद्रे यांच्या सुमारे ६०५ कोंबड्या पावसामुळे दगावल्या आहेत. शेळगी येथील पंढरीनाथ गुंडरे यांच्या गोठ्यावर वीज पडून दोन गायी, एक म्हैस व एक वासरू ठार झाले. एरंडी येथील चंद्रकांत कोल्हाळे यांचा बैलही वीज पडून ठार झाला..India Heavy Rain: देशभरात मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत, प्रशासन सतर्क.८२ मंडलांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्तमराठवाड्यातील तब्बल ८२ मंडलांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. त्यामध्ये ७१ मंडलांत १०० ते २०० मिलिमीटर दरम्यान तर ११ मंडलांत २०० ते २८५ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला आहे..दृष्टिक्षेपात...तुफान अतिवृष्टीमुळे नांदेड - हैदराबाद वाहतूक सहा तास बंद.मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, हळद, ज्वारी पाण्याखाली गेल्याने नुकसाननांदेडला तीन जणांचा मृत्यू८२ मंडलांत १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस.मूग, उडीद पिकांचे नुकसानसलग झालेल्या या पावसाने मूग व उडीद हातचे गेले आहे. फूलगळती मोठ्या प्रमाणात झाल्याने सोयाबीनसह सर्वच पिकांच्या उत्पन्नात मोठी घट होणार आहे. भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे..नांदेडमध्ये १३२.७ मिमी पाऊसमराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये सरासरी १३२.७ मिलिमीटर, लातूरमध्ये ९१.८, बीडमध्ये ४८.४, परभणीत ३८.४, छत्रपती संभाजीनगर २९.९, हिंगोली जिल्ह्यात सरासरी १९.९, धाराशिवमध्ये १६.१, तर जालना जिल्ह्यात १३.१ मिलिमीटर पाऊस पडला..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.