Summer Heat Update: राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने पारा चाळिशीपार गेला आहे. यातच वादळी पावसाचे सावट अद्यापही कायम आहे. आज (ता. २६) दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता, तसेच कोकणात उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याचे सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) कायम असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे..दक्षिण कर्नाटक आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच मराठवाड्यापासून दक्षिण कर्नाटकापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. बुधवारी (ता. २५) सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये महाराष्ट्रातील अमरावती आणि वर्धा येथे देशातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर पंजाबच्या भटिंडा येथे नीचांकी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे..उन्हाच्या झळा वाढल्याने दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. तर उकाडा वाढल्याने घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. बुधवारी (ता. २५) अमरावती आणि वर्धा येथे राज्यातील उच्चांकी ४० अंश तापमान नोंदले गेले. परभणी आणि अकोला येथे ३९ अंशापेक्षा अधिक, धुळे, मालेगाव, सोलापूर, ब्रह्मपुरी, वाशीम, यवतमाळ ३८ अंश सेल्सिअस आणि त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..Pre Monsoon Rain: विदर्भात वादळी पावसाचा अंदाज; मराठवाडा, मध्यमहाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाची शक्यता.आज (ता. २६) कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, तर विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. तसेच कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांत उष्ण लाटेचा व दमट हवामानाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता आहे..बुधवारी (ता. २५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३७.०---१९.८अहिल्यानगर---निरंक---१८.४धुळे---३८.८---१७.५जळगाव---३७.७---२२.४जेऊर---३७.५---२१.०कोल्हापूर---३६.१--२३.१.महाबळेश्वर---२९.१---१९.२मालेगाव---३८.०---१८.४नाशिक---३५.८---१८.०निफाड---३७.५---१३.४सांगली---३६.९---२२.६सातारा---३७.२---२१.०सोलापूर---३८.६---२४.९सांताक्रूझ---३६.६---२४.५डहाणू---३४.३---२१.७.Summer Weather Alert: उन्हाच्या चटक्यात सातत्यपूर्ण वाढ वादळी पावसाचा अंदाज कायम.रत्नागिरी---३३.३---२४.४छत्रपती संभाजीनगर---३६.४---२१.२धाराशिव---३६.९---२०.२परभणी---३९.३---२२.६परभणी (कृषी)---३७.२---१९.०अकोला---३९.६---२१.५अमरावती---४०.०---२०.९भंडारा---३७.०---२३.०.बुलडाणा---३६.८---२४.२ब्रह्मपुरी---३८.८---२२.५चंद्रपूर---३७.६---२३.८गडचिरोली---३६.६---२०.६गोंदिया---३७.५---२१.२नागपूर---३७.६---१९.०वर्धा---४०.०---२१.०वाशीम---३८.४---१८.४.यवतमाळ---३८.०---२०.२सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१३.४---३८.८पश्चिम महाराष्ट्र---१९.८---३८.६मराठवाडा---१९.०---३९.३विदर्भ---१८.४---४०.०कोकण---२१.७---३६.६.उष्ण लाट व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी.विजांसह वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणेअमरावती ४०, वर्धा ४०, परभणी ३९.३, अकोला ३९.६..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.