Maharashtra Heat Forecast: राज्यात वाढलेल्या उन्हाच्या झळा काहीशा कमी होण्याची शक्यता आहे. उष्णतेची लाट कमी होणार असल्याने तापमानात काहीशी घट होण्याचे संकेत आहेत. आज (ता. ३०) राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची, तसेच तुरळक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे..बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्र आणि परिसरावर केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वारे वाहणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तर कर्नाटकपासून मन्नारच्या आखातापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे..बुधवारी (ता. २९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला आणि अमरावती येथे राज्यातील उच्चांकी ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. वर्धा येथे ४५ अंश, धुळे, जळगाव, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर आणि यवतमाळ येथे ४४ अंश व त्यापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. तर मालेगाव, सोलापूर, परभणी, ब्रह्मपुरी आणि वाशीम अंशापेक्षा अधिक तापमान नोंदले गेले. धुळे येथील कृषी महाविद्यालय आणि महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी २०.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..Maharashtra Heat Wave : विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा; शनिवारी आणि रविवारी ४ जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा अंदाज.राज्यात तीव्र उन्हाळा अनुभवल्यानंतर कमाल तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. विदर्भात ४७ अंशांपर्यंत गेलेले तापमान ४५ अंशापर्यंत खाली आले आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या कमाल तापमानात २ ते ३ अंशांची घट होण्याचे संकेत आहेत. दरम्यान, आज (ता. ३०) राज्यात उन्हाच्या चटका कायम राहण्याचा व तुरळक ठिकाणी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..बुधवारी (ता. २९) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३९.७---२३.२अहिल्यानगर---४१.८---२४.३धुळे---४४---२०.४जळगाव---४४---२६.२जेऊर---४२.५---२२.०कोल्हापूर---३७.५--२४.६.महाबळेश्वर---३२.७---२१.८मालेगाव---४३.६---२३.८नाशिक---३८.७---२०.६निफाड---४१---२१.५सांगली---४०.५---२४.८सातारा---४०.५---२४.८सोलापूर---४३.६---२८सांताक्रूझ---३३.६---२५.६डहाणू---३५.६---२४.६.Vidarbha Weather Update: होरपळणाऱ्या विदर्भाला मिळणार ‘थंडावा’.रत्नागिरी---३३.५---२६.४छत्रपती संभाजीनगर---४२.८---२६.९धाराशिव---४२.२---२६.२परभणी---४३.५---२८.२परभणी (कृषी)---४२.८---२५.५अकोला---४५.२---२८.६अमरावती---४५.२---२५.९भंडारा---४२---२६बुलडाणा---४२.३---२८.२.ब्रह्मपुरी---४३.४---२६.९चंद्रपूर---४४.८---३०.२गडचिरोली---४४---२७.२गोंदिया---४२.२---२७.०नागपूर---४४.४---२६.०वर्धा---४५---२८.६वाशीम---४३.६---२७.०यवतमाळ---४४---२८.०.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---२०.४---४४पश्चिम महाराष्ट्र---२१.८---४३.६मराठवाडा---२५.५---४३.५विदर्भ---२५.९---४५.२कोकण---२४.६---३६.७उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणेअकोला ४५.२, अमरावती ४५.२, वर्धा ४५..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.