Maharashtra Weather: राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने अंगाची काहिली होत आहे. सूर्य तळपत असल्याने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. आज (ता. १३) राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मंगळवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील बारमेर येथे देशातील उच्चांकी ४७.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला राज्यातील उच्चांकी ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंदले गेले..Maharashtra Heat Wave: राज्यात उष्णतेची लाटेचा इशारा; राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमधील तापमानवाढीचा अंदाज.जळगाव आणि अमरावती येथे ४४ अंशांपेक्षा अधिक तर वर्धा, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, परभणी, आणि बुलडाणा येथे ४३ अंश सेल्सिअस, तसेच अहिल्यानगर, नाशिक, निफाड, सोलापूर, भंडारा, ब्रह्मपुरी, नागपूर, वाशीम येथे ४२ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली. जेऊर येथे राज्यातील नीचांकी २० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होत आहे. आज (ता. १३) उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातील जालना, बीड, परभणी आणि विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे..Weekly Weather: कमाल तापमान वाढीसह पावसाची शक्यता.सरासरी तापमान (अंश से.)विभाग किमान कमालउत्तर महाराष्ट्र २० ४४.५पश्चिम महाराष्ट्र २३.७ ४४.३मराठवाडा २३.२ ४३.२विदर्भ २५ ४५.१कोकण २६.२ ३७.९.मंगळवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)शहर कमाल किमानपुणे ४१.६ २६.३अहिल्यानगर ४२.२ २४.५जळगाव ४४.३ २७.५जेऊर ४१.० २०कोल्हापूर ३८.९ २४.९महाबळेश्वर ३३.३ २१.६मालेगाव ४३.२ २६.८नाशिक ४२ २३.७.निफाड ४२.८ २४.५सांगली ३९.३ २५.१सातारा ४१.१ २४.१सोलापूर ४२.६ २९.६सांताक्रूझ ३५.८ २७डहाणू ३७.९ २६.२रत्नागिरी ३४.० २६.८छत्रपती संभाजीनगर ४३.४ २७.८धाराशिव निरंक २३.२परभणी ४३.२ ३०परभणी (कृषी) ४२.७ २७.९अकोला ४५.१ २९.१.अमरावती ४४ २६.९भंडारा ४२ २५बुलडाणा ४३.२ २८.८ब्रह्मपुरी ४२.२ २६.९चंद्रपूर ४१ २८गडचिरोली ४०.६ २७.६गोंदिया ३९.२ २५.६नागपूर ४२ २६.४वर्धा ४३.८ २८वाशीम ४२.६ २६यवतमाळ ४१.४ २६.४.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.