Maharashtra Weather Update: सूर्य आग ओकायला लागल्याने विदर्भ अक्षरशः भाजून निघत आहे. राज्यात उन्हाचा चटका असह्य होत आहे. आज (ता. १६) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे. उष्ण लाटेचा अंदाज असतानाच शनिवारपासून (ता. १८) पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली आहे. .महिन्याच्या सुरुवातीला राज्यात जोरदार पूर्वमोसमी पाऊस आणि गारपिटीने तडाखा दिल्यानंतर दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमानात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. विदर्भात तापमानाचा चटका अधिक असल्याने अकोल्यासह काही ठिकाणे देशातील सर्वांत उष्ण शहरांच्या यादीत झळकली. अकोला येथे सातत्याने हंगामातील उच्चांकी तापमान नोंदले जात असून, बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली..कोकणात उष्ण व दमट हवामान असून, उर्वरित राज्यात सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा चाळिशीपार पोहोचला आहे. सकाळपासून उन्हाचा ताप वाढत असून, दुपारी झळा तापदायक ठरत आहेत. उकाडा कायम असून, घामाच्या धारा वाहत आहेत. बुधवारी (ता. १५) अकोलापाठोपाठ अमरावती, वर्धा आणि सोलापूर येथे ४३ अंश सेल्सिअस तापमानाची, तर धुळे, जळगाव, परभणी, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वाशीम, यवतमाळ येथे कमाल तापमानाचा पारा ४२ अंशांपार गेल्याचे दिसून आले..Maharashtra Heat Wave: उष्णतेच्या लाटेसह पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा.दरम्यान, धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १५.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानाचा पारा २० अंशांपार आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यान केंद्राकडून बाहेरच्या दिशेने वारे वाहणारी चक्राकार वाऱ्याची स्थिती, उत्तर कर्नाटकातील चक्राकार वाऱ्यांची स्थिती तसेच आग्नेय मध्य प्रदेशापासून विदर्भ, मराठवाडा ते कोमोरिन भागापर्यंतचा हवेचा कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत आहे..आज (ता. १६) कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा येथे उष्ण लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. तर शनिवारपासून (ता. १८) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पूर्वमोसमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे..Highest Temperature City: अकोला ठरले जगातील सर्वांत उष्ण शहर.बुधवारी (ता. १५) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३९.९---१८.९धुळे---४२.०---१५.८जळगाव---४२.५---२४.१जेऊर---४१.५---२२.०कोल्हापूर---३८.९--२४.४महाबळेश्वर---३४.५---२२.४मालेगाव---४१.६---२०.८.नाशिक---३९.३---१९.९निफाड---४०.५---१७.०सांगली---४१.१---२४.९सातारा---४०.९---२२.४सोलापूर---४३.२---२६.५सांताक्रूझ---३६.०---२४.६डहाणू---३५.८---२२.५रत्नागिरी---३४.०---२४.५.छत्रपती संभाजीनगर---४१.४---२४.४धाराशिव---४०.८---२२.०परभणी---४२.१---२४.३परभणी (कृषी)---४१.७---१९.९अकोला---४४.०---२५.३अमरावती---४३.८---२२.८भंडारा---४०.०---२४.०बुलडाणा---४१.६---२७.४ब्रह्मपुरी---४२.०---२४.९.चंद्रपूर---४२.२---२६.५गडचिरोली---४२.६---२५.२गोंदिया---४१.१---२३.५नागपूर---४२.२---२२.६वर्धा---४३.५---२५.०वाशीम---४२.४---२१.४यवतमाळ---४२.६---२४.२.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१५.८---४२.५पश्चिम महाराष्ट्र---१८.९---४३.२मराठवाडा---१९.९---४२.१विदर्भ---२१.४---४४.०कोकण---२२.५---३६.०.उष्ण व दमट हवामानाचा इशारा (येलो अलर्ट) :पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.उष्णतेच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती आणि वर्धा.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे :अकोला ४४, अमरावती ४३.८, वर्धा ४३.५, सोलापूर ४३.२..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.