Pune News: राज्याच्या कमाल तापमानात वाढ झाल्याने फेब्रुवारी महिन्याचा उन्हाच्या झळा अनुभवायाला मिळत आहेत. कोकणात उन्हाचा चटका वाढू लागला आहे. आज (ता. १३) कोकणच्या कमाल तापमानात वाढ होत उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्याच्या कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे..उत्तर भारतात थंडीचा कडाका कमी झाला असून, गुरुवारी (ता. १२) पंजाबच्या अमृतसर येथे देशाच्या सपाट भुभागावरील नीचांकी ६.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांमध्ये कर्नाटकच्या कारवार येथे देशातील उच्चांकी ३७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आग्नेय बंगालच्या उपसागरामध्ये समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत असून, या वाऱ्यांच्या प्रभावामुळे शनिवारपर्यंत (ता.१५) हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे..Weather Update: राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला.गुरुवारी (ता. १२) धुळे येथील कृषी महाविद्यालय, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि जेऊर येथे राज्यातील नीचांकी ११.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर कोकणातील रत्नागिरी येथे राज्यातील उच्चांकी ३५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उन्हाचा चटका वाढल्याने उकाड्यातही वाढ झाली आहे. आज (ता. १३) किमान तापमान स्थिर राहणार असून, कोकणात उष्ण व दमट हवामानाची शक्यता हवामान विभागाने वर्तविला आहे..सरासरी तापमान (अंश से.)विभाग किमान कमालउत्तर महाराष्ट्र ११.५ ३३.३पश्चिम महाराष्ट्र ११.५ ३४.४मराठवाडा ११.५ ३२.६विदर्भ १२.० ३५.६कोकण १९.६ ३५.४.Weather Update: उष्ण, दमट हवामानाचा अंदाज; राज्यातील कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडा वाढला.गुरुवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान. (अंश सेल्सिअसमध्ये)शहर कमाल किमानपुणे ३१.९ १४.४अहिल्यानगर ३२.० १३.५धुळे ३१.० ११.५जळगाव ३३.३ १४.५जेऊर ३२.५ ११.५कोल्हापूर ३१.० १८.२महाबळेश्वर २६.० १५.०.मालेगाव ३२.८ १५.२नाशिक ३२.३ १५.२निफाड ३०.७ ११.९सांगली ३२.६ १८.६सातारा ३२.७ १५.१सोलापूर ३४.४ १८.०सांताक्रूझ ३३.६ २०.२डहाणू २९.९ १९.६रत्नागिरी ३५.४ १९.८.छत्रपती संभाजीनगर ३२.० १६.०धारशिव ३२.१ १५.०परभणी ३२.० १५.५परभणी (कृषी) ३१.० ११.५अकोला ३४.१ १८.३अमरावती ३५.६ १५.२बुलडाणा ३२.८ १८.७.ब्रह्मपुरी ३५.४ १६.४चंद्रपूर ३३.२ १७.०गडचिरोली ३२.४ १५.०गोंदिया ३२.० १५.०नागपूर ३२.४ १५.२वर्धा ३३.० १६.५वाशीम ३२.० १५.४यवतमाळ ३२.८ १३.०.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.