Pune News: अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून गुजरात आणि पाकिस्तानच्या किनाऱ्यालगत ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. ‘शक्ती’ हे २०२५ मधील पहिलेच चक्रीवादळ आहे. किनाऱ्यापासून दूर पश्चिमेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ आज (ता. ४) आणखी तीव्र होण्याचे संकेत आहेत. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात फारसा प्रभाव जाणवणार नाही. .बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्र मध्य भारतातून प्रवास करत अरबी समुद्राकडे आल्यानंतर ईशान्य अरबी समुद्रात त्याची तीव्रता वाढू लागली आहे. शुक्रवारी (ता. ३) सकाळी ही प्रणाली गुजरातच्या द्वारकापासून २५० किलोमीटर, तर नालियापासून २८० किलोमीटर नैॡत्येकडे, पोरबंदरपासून २८० किलोमीटर पश्चिमेकडे आणि पाकिस्तानच्या कराचीपासून ३८० किलोमीटर दक्षिणेकडे होती. शुक्रवारी दुपारनंतर ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली..Cyclone Fengal : चक्रीवादळ फेंगलचे उग्र रूप! चेन्नईत ३ जणांचा मृत्यू, पुद्दुचेरीत लष्कराने १०० जणांची केली सुटका .गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बंगालच्या उपसागरात ‘फेंगल’ चक्रीवादळ तयार झाले होते. ३० नोव्हेंबर रोजी ‘फेंगल’ तमिळनाडूच्या किनाऱ्याला धडकले होते. त्यानंतर जवळपास ११ महिन्यांनी अरबी समुद्रात ‘शक्ती’ चक्रीवादळाची निर्मिती झाली असून, २०२५ वर्षातील हे पहिले चक्रीवादळ ठरले आहे. ‘शक्ती’ हे नाव श्रीलंका देशाने सुचविले आहे. तमिळ भाषेतील ‘शख्ती’ (शक्ती) या शब्दाचा अर्थ ‘सामर्थ्य’ असा आहे..‘शक्ती’ भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून दूर समुद्राकडे जात असून, आज (ता. ४) मध्य अरबी समुद्रात आणखी तीव्र होणार आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे अरबी समुद्रात ताशी १०० ते १२५ किलोमीटर वेगाने वारे वाहणार असून, ही प्रणाली सोमवारपर्यंत (ता. ६) कायम राहणार आहे..Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात विजांसह पावसाचा अंदाज.गुजरात आणि उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत उद्यापर्यंत (ता. ५) ४५ ते ६५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची व समुद्र खवळून, उंच लाटा उसळण्याची शक्यता असल्याने मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे..उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्रबंगालच्या उपसागरात तयार झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारी दुपारी ओडिशामध्ये जमिनीवर आले असून, गोपाळपूरपासून ५० किलोमीटर नैर्ऋत्येकडे ही प्रणाली होती. उत्तरेकडे सरकत असलेली ही प्रणाली आज (ता. ४) छत्तीसगडकडे जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.