Montha Cyclone: मोंथा चक्रीवादळामुळे २ दिवस पावसाचा अंदाज; चक्रीवादळ आज रात्रीपर्यंत किनारपट्टीला धडकणार
Weather Alert: बंगालच्या उपसागरातील मोंथा चक्रीवादळाने आज सकाळी अतितीव्र रूप घेतले असून, रात्री ते आंध्र प्रदेशातील काकीनाड किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळासोबतच अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्रामुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.