Pune News: उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह धडकत असल्याने मध्य महाराष्ट्रात थंडीची लाट कायम आहे. आज (ता. २) राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह हुडहुडी कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्रात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..राज्यात हुडहुडी कायम असून, पहाटे धुक्यासह, दव पडत आहे. सोमवारी (ता. १) धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी ७ अंश तापमानाची नोंद झाली. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ७.७ अंश सेल्सिअस, तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ८.४ अंश, तसेच जेऊर, अहिल्यानगर, पुणे, नाशिक येथे पारा १० अंश व त्यापेक्षा खाली आल्याने हुडहुडी वाढली आहे..Hawaman Andaj: थंडीच्या लाटेचा इशारा; राज्यातील बहुतांशी भागात किमान तापमानात घट .दरम्यान सोमवारी (ता. १) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकणातील रत्नागिरी येथे ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आज (ता. २) मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात गारठा कायम राहणार आहे..‘डिटवाह’ चक्रीवादळ निवळलेबंगालच्या उपसागरातील ‘डिटवाह’ चक्रीवादळ निवळून गेले असून, त्याचे अवशेष असलेली वादळी प्रणाली (डीप डिप्रेशन) तमिळनाडूच्या किनाऱ्याजवळ सक्रिय आहे. या प्रणालीचे केंद्र चेन्नईपासून ५० किलोमीटर, पदुचेरीपासून १३० किलोमीटर पूर्वेकडे कुड्डालोरपासून १५० किलोमीटर ईशान्यकडे, नेल्लोरपासून २०० किलोमीटर दक्षिणेकडे होते. किनारपट्टीला समांतर मार्गक्रमण करताना या प्रणालीची तीव्रता ओसरून जाणार आहे. पूर्व किनाऱ्यावर ढगांची दाटी झाली असून, जोरदार पावसाच्या सरींची शक्यता आहे..सोमवारी (ता. १) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---२७.९---१०.०अहिल्यानगर---२७.९---९.४धुळे---२८.५---७.०जळगाव---२८.७---१०.८जेऊर---३०.०---९.०कोल्हापूर---२८.९---१६.९.Weather Update: मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा.महाबळेश्वर---२५.१---१२.२मालेगाव---२६.०---१०.४नाशिक---२७.७---१०.०निफाड---२८.८---७.७सांगली---२९.७---१५.१सातारा---२९.७---११.९सोलापूर---३२.१---१६.०सांताक्रूझ---३१.५---१६.६डहाणू---३१.८---१६.०.रत्नागिरी---३४.०---१९.०छत्रपती संभाजीनगर---२९.२---११.६धाराशिव---२८.२---१३.६परभणी---२८.२---१६.७परभणी (कृषी)---२७.७---८.४अकोला---२९.३---१३.३अमरावती---२९.४---१२.५भंडारा---३०.०---१२.०.बुलडाणा---२८.५---१३.४ब्रह्मपुरी---३०.४---१६.६चंद्रपूर---२९.४---१५.६गडचिरोली---२८.४---१२.४गोंदिया---२७.६---१३.४नागपूर---२७.४---१२.०वर्धा---२७.५---१२.८वाशीम---२७.४---११.०यवतमाळ---३०.०---१०.८.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---७.०---२८.८पश्चिम महाराष्ट्र---९.०---३२.१मराठवाडा---८.४---२९.२विदर्भ---१०.८---३०.४कोकण---१५.०---३४.०.थंडीच्या लाटेचा इशारा (येलो अलर्ट) : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर.राज्यात थंडी असलेली ठिकाणे : धुळे ७, निफाड ७.७, परभणी (कृषी) ८.४, जेऊर ९, अहिल्यानगर ९.४, पुणे १०, नाशिक १०..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.