New Delhi News: उत्तर भारतात तापमानात घसरण नोंदवली जात असून अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार १५ नोव्हेंबरपर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना, पंजाब, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे. .राजधानी नवी दिल्लीमध्ये आज सकाळी हवेच्या गुणवत्तेत थोडासा सुधार दिसला असला तरी शहरातील अनेक भागांमध्ये एक्यूआय ४०० च्या वर नोंदला गेला. पण दिल्ली-एनसीआरमधील काही भाग सतत गंभीर श्रेणीत असताना त्यात किंचित सुधारणा झाल्याचे मानले जात आहे. राजधानीतील वजीरपूर, चांदनी चौक, रोहिणी हा सर्वाधिक दूषित भाग असून तेथील एक्युआयची पातळी गंभीर स्तरावर असल्याचे म्हटले आहे..Maharashtra Cold Weather: जळगावमध्ये थंडीच्या लाटेचा इशारा.डीटीयू, दिलशाद गार्डन परिसर‘खराब’ श्रेणीत असून तुलनेने त्यात थोडी सुधारणा झाल्याचे म्हटले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता वर्तविली गेली. दिल्लीतील हवा अत्यंत खराब श्रेणीत असून, सकाळी सहा वाजता नोंदले गेलेल्या हवेच्या गुणवत्ता निर्देशाकांची आकडेवारी अशी..पूसा : ४२१, शादीपूर : ४३४, पंजाबी बाग किंवा शिवाजी पार्क : ४८८, नॉर्थ कॅम्पस किंवा दिल्ली मिल्क स्कीम: ४६२, एफ. मुंडका : ४८१ इतका एक्यूआय नोंदला गेला आहे. दरम्यान, पश्चिम हिमालयीन राज्यांत बर्फवृष्टीचे वातावरण तयार झाले आहे. हिमाचल प्रदेश आणि जम्मू-कश्मीरच्या अनेक भागांमध्ये हिमवर्षावासह थंडीची लाट जाणवू शकते. दुसरीकडे तमिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे..भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार तमिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी येथे पुढील २४ तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. अंदमान-निकोबार, लक्षद्वीप आणि अरुणाचल प्रदेशामध्येही हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.उत्तराखंड राज्यात थंडी वाढवणारा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.