Weekly Weather: बहुतांश जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता
Weather Update: महाराष्ट्रावर आजपासून शनिवार (ता. ८ ते १२ ) पर्यंत हवेच्या दाबात वाढ होत जाईल. आज (ता. ८) हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल आणि मंगळवारपासून (ता.९) पुढे १००६ ते १००८ हेप्टापास्कल इतके राहतील. त्यानुसार शनिवारपर्यंत महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता राहील. मात्र त्यानंतर पावसात बराच काळ उघडीप आणि सूर्यप्रकाश अशी हवामान स्थिती राहील.