Maharashtra Winter Weather: पूर्व विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता
Weather Update: राज्याच्या किमान तापमानात घट झाल्याने राज्यात थंडी वाढली आहे. आज (ता. ७) पूर्व विदर्भातील यवतमाळ, नागपूर आणि गोंदिया येथे थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.