Maharashtra Monsoon Update: माॅन्सूनचा ८ जूनपासून रखडलेला प्रवास पुढील आठवड्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १ जुलैपर्यंत संपूर्ण राज्य व्यापून माॅन्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान राहील. मात्र कोकण वगळता राज्यात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) वर्तविला आहे. .भारतीय हवामान विभागाने दोन आठवड्यांचा माॅन्सून आणि हवामानाचा अंदाज व्यक्त केला आहे. देशात १८ जूनपर्यंत सरासरीपेक्षा ३८ टक्के कमी पाऊस झाला आहे. राजस्थान, हरियाना आणि लडाख ही तीन राज्ये वगळता इतर सर्व राज्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यातही गुजरातमध्ये सरीसरीपेक्षा ७९ टक्के आणि महाराष्ट्रात ७८ टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यातील ३ जिल्ह्यांमध्ये ४० ते ५० टक्के कमी पाऊस झाला..Monsoon Progress Update: मॉन्सूनच्या प्रगतीला २३ जून दरम्यान होणार पोषक स्थिती; राज्यात उष्णतेचा चटका.तर २६ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ६० ते ९९ टक्के कमी पाऊस झाला. तर धुळे, नंदूरबार आणि ठाणे जिल्ह्यांत पाऊसच झाला नाही म्हणजेच १०० टक्के तूट आहे..विषुववृत्तीय प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला असून माॅन्सून हंगामात एल निनोची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. तर हिंद महासागरात इंडियन ओशन डायपोल तटस्थ अवस्थेत असून माॅन्सून हंगामात ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच मॅडन-ज्युलियन ऑसिलेशन (एमजेओ) पुढील आठवडाभरात वेगाने फेज २, ३, ४ आणि ५ मधून पुढे सरकण्याची शक्यता आहे. एमजेओच्या या फेज देशात आणि राज्यात पावसासाठी पोषक ठरू शकतात..Maharashtra Weather Update: राज्यात उष्ण हवामानाचा अंदाज.पुढील आठवड्यात माॅन्सून पुढे सरकणारमाॅन्सूनचा जोर २४ जूनपर्यंत कमजोर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिण आणि ईशान्य भारताचा काही भाग वगळता देशाच्या इतर भागात पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहील. राज्यात केवळ कोकणातील काही भागात जोरदार सरींचा अंदाज आहे. तर पुढील आठवड्यात म्हणजेच २५ जून ते १ जुलैच्या दरम्यान माॅन्सून सक्रिय होऊन संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. तसेच ओडिशा, झारखंड, बिहार व्यापून माॅन्सून गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता आहे..या काळात कोकणच्या किनारी भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर कर्नाटक आणि केरळच्या किनारी भागातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात कोकण आणि गोवा, कर्नाटक, रायलसिमा, केरळ आणि तमिळनाडूत सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे. तर देशाच्या इतर भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहील. राज्यातही कोकण वगळता पावसाचे प्रमाण कमी राहू शकते, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.