New Delhi News: यंदाच्या मॉन्सून हंगामात भारतात आतापर्यंत सरासरी पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, राज्यनिहाय पावसाचे वितरण प्रचंड असमान आहे..१ जून ते १० ऑगस्ट या कालावधीत देशात ५३९ मिमी पाऊस झाला आहे. दीर्घकालीन सरासरीच्या तुलनेत (५३५.६ मिमी) हे पाऊसमान १ टक्क्याने अधिक आहे. हवामान विभागाकडील नोंदीनुसार एकूण ३६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांपैकी २५ राज्यांत सर्वसाधारण म्हणजेच दीर्घकालीन सरासरीच्या १९ टक्के कमी किंवा अधिक पाऊसमान झाले आहे..पाच राज्यांमध्ये पावसात तूट दिसून आली असून, सरासरीपेक्षा २० टक्के ते ५९ टक्के कमी पर्जन्यमान झाल्याचे दिसून आले आहे. तर ५ राज्यांत सरासरीपेक्षा अधिक (२० टक्के ते ५९ टक्के अधिक) पाऊस झाला आहे. तर लडाखमध्ये सरासरीपेक्षा खूप अधिक (६० टक्क्यांहून अधिक) पाऊस झाल्याचे स्पष्ट होत आहे. तर एकही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश अत्यंत कमी श्रेणीत नाही..Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर.आतापर्यंतच्या नोंदीनुसार मॉन्सूनचा पाऊस ‘सामान्य’ दिसत असला, या हंगामात पावसाचे वितरण खूपच असमान दिसून येत आहे. पश्चिम हिमालयात विशेषतः हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये जुलै व ऑगस्टच्या सुरुवातीस ढगफुटी, महापूर, दरडी कोसळणे यांसारख्या घटना घडल्या आहेत. ज्यामुळे रस्ते आणि जनजीवन विस्कळीत झाले. तर राजधानी दिल्ली आणि परिसरातही जुलै ऑगस्टच्या शेवटी मुसळधार पावसाने आणि पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत..पावसाचे हे असमान वितरण उर्वरित हंगामात दिसण्याची शक्यता आहे. मात्र पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात (ऑगस्ट-सप्टेंबर) देशभर सरासरीपेक्षा अधिक पाऊस होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यात ईशान्य भारत आणि पूर्वेकडील काही भागांत पावसाची कमतरता राहण्याची शक्यता अधिक आहे. ईशान्य भारतात गेल्या काही वर्षांपासून सातत्याने कमी पाऊस होत आहे आणि ही क्षेत्रीय असमानता भविष्यातही कायम राहू शकते..Maharashtra Rain: विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता.हवामान विभागाने मे महिन्यात वर्तविलेल्या अंदाजानुसार जून ते सप्टेंबर दरम्यान भारतात दीर्घकालीन सरासरीच्या १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. ५० वर्षांच्या सरासरीनुसार ९६ ते १०४ टक्क्यां दरम्यानचा पाऊस ‘सामान्य’ मानला जातो. भारतातील पावसाळा हा कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, जो सुमारे ४२ टक्के लोकसंख्येच्या उपजीविकेसाठी महत्त्वाचा असून, एकूण राष्ट्रीय उत्पन्नात याचा १८.२ टक्के वाटा आहे. पिण्याचे पाणी आणि वीज निर्मितीच्या दृष्टीनेही चांगले पाऊसमान महत्त्वाचे आहे..पावसाचे प्रमाण अल्प असलेली राज्येअरुणाचल प्रदेश - ६५२.१ मिमी (४० टक्के तूट)आसाम - ६०३.८ मिमी (३७ टक्के तूट)मेघालय - ९७८.७ मिमी (४५ टक्के तूट)सिक्कीम - ८३७.४ मिमी (२० टक्के तूट)बिहार - ४३८.३ मिमी (२५ टक्के तूट).पावसाचे प्रमाण अधिक असलेली राज्ये व केंद्रशासित प्रदेश :झारखंड - ८५३.७ मिमी (४१ टक्के अधिक)दिल्ली - ४३३.५ मिमी (३७ टक्के अधिक)राजस्थान - ४३०.६ मिमी (५८ टक्के अधिक)मध्य प्रदेश - ७४५.३ मिमी (३० टक्के अधिक)पुदुच्चेरी - २५८.२ मिमी (३२ टक्के अधिक).सरासरीपेक्षा अधिक पावसाचे क्षेत्रलडाख - ३१.८ मिमी (सरासरीच्या (१४.८ मिमी) तुलनेत ११५ टक्के) अधिक)सरासरी पाऊस झालेली राज्ये :उत्तर प्रदेश - ४७८.० मिमी (११ टक्के अधिक)महाराष्ट्र - ५८५.२ मिमी (९ टक्के तूट)कर्नाटक - ५८७.८ मिमी (१० टक्के अधिक)यांसह एकूण २५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात सरासरी इतका पाऊस झाला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.