डॉ. रामचंद्र साबळेमहाराष्ट्रावर आज (ता. १४) १००८ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहील. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात बदल होईल. ईशान्य मॉन्सून दाखल झालेल्या भागात पावसाचे प्रमाण अधिक राहील. तर इतर भागांत उघडीप व सूर्यप्रकाश राहील. महाराष्ट्रावर उद्या (ता. १५) १००६ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. पूर्व भागावर हवेचे दाब १००४ हेप्टापास्कलपर्यंत कमी होताच पावसाच्या प्रमाणात वाढ होईल. .मंगळवार (ता.१६) उत्तरेकडील भागावर १००४ हेप्टापास्कल आणि पश्चिम व दक्षिण भागावर १००८ हेप्टापास्कल इतका हवेचा दाब राहील. त्यामुळे उत्तरेकडील भागात पावसाचे प्रमाण अधिक, तर दक्षिण भागात पावसात उघडीप राहणे शक्य आहे. बुधवारीही (ता.१७) तशीच स्थिती जाणवेल. मात्र गुरुवारी व शुक्रवारी (ता.१८, १९) पुन्हा हवेच्या दाबात वाढ होऊन ते १००८ हेप्टापास्कल होताच पावसाचे वितरण कमी प्रमाणात होणे शक्य आहे..आता सूर्याचे दक्षिणायन सुरू झाले आहे. सूर्य दक्षिणेच्या दिशेने प्रगती करीत असताना जेथे प्रखर सूर्यप्रकाश व तापमान वाढ होईल तेथील हवेचे दाब कमी होतील आणि ईशान्य भारताकडून दक्षिण दिशेने ढग आणि बाष्प लोटले जाईल. त्यानुसार महाराष्ट्राच्या पूर्व भागात पावसात वाढ हाईल. ईशान्य मॉन्सून सर्वसाधारणपणे १२ ते १४ ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून बाहेर पडतो. मात्र या वर्षी प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागातील पाण्याचे पृष्ठभागाचे तापमान पेरूजवळ १४ अंश सेल्सिअस, तर इक्वॅडोरजवळ २३ अंश सेल्सिअस इतके कमी राहण्यामुळे तेथील हवेच्या दाब वाढ झाली आहे..वाऱ्यांना बाष्प वाहून नेणे शक्य होत नसल्यामुळे महाराष्ट्रासह पूर्व भारतात ईशान्य मॉन्सूनचा पाऊस व त्याचा प्रभाव ऑक्टोबरअखेरपर्यंत जाणवणे शक्य आहे. हा पाऊस लागून राहत नाही. मात्र जेथे हवेचे दाब कमी होतात तेथेच तो होतो. विशेषतः महाराष्ट्राच्या अवर्षणप्रवण पूर्व भागात त्याचा प्रभाव अधिक असतो. आता राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, दिल्ली या भागातून मॉन्सून बाहेर पडत आहे. पुढील एक ते दीड महिन्यात अवर्षणप्रवण भागात जोराचे पाऊस होण्याची शक्यता राहील..Monsoon Rain: विदर्भ, मराठवाड्यात ३ दिवस जोरदार पावसाचा अंदाज .कोकण :आज (ता.१४) सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ते ८ मि.मी., तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ९ ते ११ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा ईशान्येकडून, तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत वायव्य व उत्तरेकडून राहील. पालघर जिल्ह्यात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग सर्वच जिल्ह्यांत १ ते ३ कि.मी. राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस,.तर ठाणे जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस राहील. पालघर जिल्ह्यात कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस, तर पालघर जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. कोकणातील सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता ठाणे व पालघर जिल्ह्यांत ७३ टक्के, तर सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत ८७ टक्के राहील..उत्तर महाराष्ट्र :आज (ता.१४) धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत ६ मि.मी. पावसाची शक्यता राहील. तर नाशिक जिल्ह्यात १० मि.मी. आणि जळगाव जिल्ह्यात १३ मि.मी. राहील. नंदुरबार, जळगाव, धुळे व नाशिक जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांत ताशी ७ कि.मी., तर जळगाव जिल्ह्यात ताशी ८ कि.मी. आणि धुळे जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील..कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, तर धुळे व नंदुरबार जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस आणि जळगाव जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सर्व जिल्ह्यात आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९५ टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ८७ टक्के राहील..Monsoon Rain Alert: राज्यात २ दिवस मुसळधारेची शक्यता; विदर्भ, मराठवाड्यात ३ दिवस जोरदार पावसाचा अंदाज.मराठवाडा :आज (ता.१४) धाराशिव, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांत ३० मि.मी., तर लातूर जिल्ह्यात २१ मि.मी. पावसाची शक्यता आहे. तसेच बीड जिल्ह्यात १८ मि.मी., परभणी जिल्ह्यात २६ मि.मी., जालना जिल्ह्यात १४ मि.मी. आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ११ मि.मी. पावसाची शक्यता आहे. जेथे हवेचे दाब कमी राहतील तेथेच आज (ता.१४) पावसाची शक्यता राहील. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. नांदेड व परभणी जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग ९ कि.मी., तर हिंगोली व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत ताशी १० कि.मी. राहील..धाराशिव, लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १२ कि.मी. राहील. कमाल तापमान धाराशिव जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर लातूर, बीड व जालना जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. कमाल तापमान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस, तर हिंगोली व परभणी जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस आणि नांदेड जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धाराशिव जिल्ह्यात २० अंश सेल्सिअस, लातूर जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, तर नांदेड, बीड, जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ ते ९० टक्के व दुपारची सापेक्ष आर्द्रता ६३ ते ७७ टक्के राहील..पश्चिम विदर्भ :आज (ता.१४) वाशीम जिल्ह्यात ७० मि.मी., बुलडाणा, अकोला व अमरावती जिल्ह्यांत १४ ते १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा सर्वच जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग अकोला व अमरावती जिल्ह्यांत ७ ते ९ कि.मी., तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत ताशी १४ कि.मी. राहील..कमाल तापमान बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस, तर अमरावती जिल्ह्यात २९ अंश सेल्सिअस आणि अकोला जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान बुलडाणा, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २३ अंश सेल्सिअस, तर अकोला जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६५ टक्के राहील..मध्य विदर्भ:आज (ता.१४) यवतमाळ जिल्ह्यात ७० मि.मी., वर्धा जिल्ह्यात २१ मि.मी. आणि नागपूर जिल्ह्यात १७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ताशी ८ कि.मी. आणि यवतमाळ जिल्ह्यात ताशी १० कि.मी. राहील. कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात २८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश सर्वच जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९२ टक्के , तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ६८ टक्के राहील..पूर्व विदर्भ :आज (ता.१४) भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत १३ ते १४ मि.मी., तर चंद्रपूर जिल्ह्यात १७ मि.मी. आणि गडचिरोली जिल्ह्यात १९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा चंद्रपूर जिल्ह्यात वायव्येकडून, तर गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ईशान्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग २ ते ५ कि.मी. राहील. कमाल तापमान गोंदिया जिल्ह्यात ३० अंश सेल्सिअस, तर चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सर्वच जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ९४ ते ९७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६६ ते ६९ टक्के राहील..पश्चिम महाराष्ट्र :आज (ता.१४) कोल्हापूर जिल्ह्यात ७ मि.मी., पुणे जिल्ह्यात १३ मि.मी., तर सातारा व अहिल्यानगर जिल्ह्यांत १४ मि.मी. आणि सांगली जिल्ह्यात १५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात मात्र २९ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सर्वच जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग कोल्हापूर जिल्ह्यात ताशी ४ मि.मी., तर सातारा व पुणे जिल्ह्यांत ताशी ६ ते ८ कि.मी., सांगली जिल्ह्यात ताशी १० कि.मी., अहिल्यानगर जिल्ह्यात ताशी ११ कि.मी. आणि सोलापूर जिल्ह्यात ताशी १३ कि.मी. राहील..कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत कमाल तापमान २५ अंश सेल्सिअस, तर पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २० ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. कोल्हापूर, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ८८ टक्के, तर सांगली व सातारा जिल्ह्यांत ९७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सर्वच जिल्ह्यात ७६ ते ८८ टक्के राहील..कृषी सल्ला :- वाशीम व यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता असल्याने अधिक पाऊस झाल्यास शेतातील पाण्याचा निचरा करावा.- पावसात उघडीप पाहून मूग व उडदाच्या शेंगा तोडाव्यात.- जमिनीत वाफसा येताच करडई, सूर्यफूल, रब्बी ज्वारी पेरणीच्या कामांस सुरुवात करावी.- नवीन फळबाग लागवडीतील रोपांना काठीचा आधार द्यावा..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.