Weather Update: जगभरात हवामान बदलाचे परिणाम अधिक तीव्र होत चालले असून, एप्रिल २०२६ हा जागतिक इतिहासातील तिसरा सर्वाधिक उष्ण एप्रिल महिना ठरला आहे. त्याच वेळी महासागरांच्या पृष्ठभागावरील तापमान (सी सरफेस टेंपरेचर- एसएसटी) उच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचले असून, आगामी महिन्यांत ‘एल निनो’ची स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे..‘युरोपियन सेंटर फॉर मीडियम-रेंज वेदर फोरकास्ट्स’ (ईसीएमडब्ल्यूएफ) अंतर्गत कार्यरत कोपर्निकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या (सीथ्रीएस) अहवालानुसार, एप्रिल २०२६ मधील जागतिक सरासरी तापमान १४.८९ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते १९९१ ते २०२० या कालावधीतील सरासरीपेक्षा ०.५२ अंशांनी अधिक आहे. २०२४ मधील एप्रिल हा सर्वाधिक उष्ण, तर २०२५ मधील एप्रिल दुसऱ्या क्रमांकाचा उष्ण महिना होता..Indian Monsoon: मॉन्सूनची आगेकूच!.महासागर तापले; ‘एल निनो’कडे कलया अहवालानुसार, ६० अंश दक्षिण ते ६० अंश उत्तर या पट्ट्यातील महासागरांच्या पृष्ठभागावरील सरासरी तापमान एप्रिलमध्ये २१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. हे त्या महिन्यासाठीचे दुसरे उच्चांकी तापमान मानले जात आहे. विशेषतः विषुववृत्तीय प्रशांत महासागरापासून अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापर्यंत समुद्रात तीव्र ‘मरीन हीटवेव्ह’ स्थिती दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, सध्या हवामानप्रणाली ‘एन्सो-न्यूट्रल’ (सरासरी तापमानाजवळ) स्थितीतून हळूहळू ‘एल निनो’कडे सरकत आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांत जागतिक तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे..Maharashtra Weather Forecast : विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा.टोकाचे हवामानबदलएप्रिल महिन्यात जगभरात तीव्र हवामान बदलाशी संबंधित अनेक घटना घडल्या. प्रशांत महासागरात चक्रीवादळे, पश्चिम आशिया व दक्षिण-मध्य आशियात पूरस्थिती, तसेच दक्षिण आफ्रिकेत दुष्काळाची स्थिती दिसून आली. अरब द्वीपकल्प, इराण, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि सीरियामध्ये आकस्मिक पूर (फ्लॅश फ्लड्स) व भूस्खलनाच्या घटना घडल्या..आर्क्टिकमधील बर्फात घटएप्रिल महिन्यात आर्क्टिक समुद्रातील बर्फाचे क्षेत्रफळ इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाच्या नीचांकी पातळीवर राहिले. वर्षाच्या सुरुवातीपासूनच ते सरासरीपेक्षा कमी राहिल्याचे अहवालात नमूद आहे. ‘ईसीएमडब्ल्यूएफ’मधील हवामानतज्ज्ञ समांथा बर्गेस यांनी सांगितले, की वाढत चाललेले जागतिक तापमान, महासागरांतील उष्ण लाटा, कमी होत चाललेला आर्क्टिक समुद्रातील बर्फ आणि पर्जन्यमानातील तफावत ही हवामान बदलाची गंभीरता दर्शविणारी चिन्हे आहेत..एप्रिलचा तडाखा - जागतिक सरासरी तापमान - १४.८९महासागरीय पृष्ठभागावरील तापमान- २१सरासरीपेक्षा वाढ- +०.५२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.