Women Farmers : १५ महिलांनी १० एकर पडीत जमीन फुलवली; सामूहिक शेतीचा प्रेरणादायी प्रयोग

ग्रामीण भागातील महिला एकत्र आल्या तर शेतीलाही नवी दिशा देता येते, याचं प्रेरणादायी उदाहरण रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील वेरळ तर्फे नातू गावात पाहायला मिळत आहे. येथील भरारी महिला शेतकरी उत्पादक गटातील १५ महिलांनी तब्बल १० एकर पडीत जमिनीवर सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग साकारला आहे. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने स्थापन झालेल्या या गटात ज्येष्ठ महिलांचाही उत्साहाने सहभाग आहे. सेंद्रिय शेती, जैविक कीड व्यवस्थापन आणि मृदासंवर्धनासोबतच महिला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे कृषी तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन घेत आहेत. सामूहिक श्रम, नियोजन आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने पडीत जमीन हिरवीगार करण्यासोबतच महिलांनी आर्थिक स्वावलंबनाची नवी वाटही निर्माण केली आहे. चला, पाहूया महिलांच्या एकीने फुललेली ही सामूहिक शेती आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com