Video
Soyabean Oil Import : अमेरिकेतून भारतात सोयातेलाची आयात वाढणार?
US India Trade Deal: भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (ता. २) प्रथमच केली. मात्र, या घोषणेनंतर भारतात मोठ्या प्रमाणावर टीका सुरू झाली. ट्रम्प यांनी भारतावरील आयात शुल्क कमी केल्याचे तसेच भारताने शुल्क शून्यावर आणल्याचे सांगितले होते. पण त्यानंतर तब्बल दोन दिवस भारत सरकारकडून या कराराबाबत कोणतीही सविस्तर माहिती देण्यात आली नाही.
