Farmer Loan: कर्जमाफीवर सरकार का बोलत नाही ?

Election 2024: सरकार निवडणुकीच्या आधी कर्जमाफी करेल, अशी चर्चा प्रशानपातळीवर आहे. पण सध्याची सरकारची एकूण मानसिकता पाहीली तर सरकार लाडकी बहीण योजना, मोफत वीज, नमो शेतकरी सन्मान योजना आणि पीकविमा भरपाई या योजनांच्या जोरवर निवडणुकीत उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

loan waiver: शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी अजेंड्यावर ठेवलेली दिसते. असं असलं तरी सरकार सगळं वातावरण लाडकी बहीण योजना, कापूस आणि सोयाबीन अनुदान, पीकविमा भरपाई, मोफत वीज याभोवती फिरवत आहे. सरकार या योजनांवर जोर देऊन कर्जमाफीच्या मागणीची धार बोथट करण्याचा प्रयत्न करत आहे. पण सरकार जर हे सगळं निवडणूक जिंकण्यासाठी करत असेल तर सरकार शेतकऱ्यांची नाराजी घेणार नाही. शेतकऱ्यांनी पुढच्या काळात कर्जमाफीचा मुद्दा अजेंड्यावर आणला, जोरदार मागणी केली तर सरकार कर्जमाफीही करेल. पण त्यासाठी शेतकऱ्यांचा रेटा आवश्यक असेल. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com