Video
Sugarcane FRP : मराठवाड्यात उसाला वाढीव दर कोणता कारखाना देणार?
Marathwada sugarcane price: मराठवाड्यात ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. परभणी आणि बीड जिल्ह्यांत गेल्या सात दिवसांपासून ऊस आंदोलनाला जोरदार उधाण आलं आहे. किसान सभा आणि ऊस उत्पादक संघर्ष समितीने पुढाकार घेत ‘कोयता बंद’ आंदोलन छेडल्याने काही साखर कारखान्यांनी वाढीव एफआरपी देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
