Farmer Loan Waiver Eligibility: राज्य सरकारने २ जून २०२६ रोजी शेतकरी कर्जमाफीसंदर्भातील शासन निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयानुसार दोन लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाची माफी करण्यात येणार असून, नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, २०१९ मधील कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी या निर्णयात एक महत्त्वाची अट घालण्यात आली आहे. अशा शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीऐवजी कर्जाची परतफेड केल्यानंतरच ५० हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या नव्या निकषांमुळे प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार? शासनाच्या या निर्णयामागे नेमका उद्देश काय आहे? तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीत काही वेगळी अट किंवा रणनीती ठेवली आहे का? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील मुलाखतीचा व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.