Video
Wheat Late Sowing: दुष्काळात गव्हाची पेरणी करताना कोणत्या गोष्टी बदलाव्या?
Wheat Cultivation:यावर्षी गव्हाची उशिरा पेरणी जास्तीत जास्त १५ डिसेंबरपर्यंतच करण्याचा सल्ला गहू पैदासकार तज्ज्ञांनी दिला आहे.. त्यातही बागायती लागवडीलाच शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यायचंय.. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे उशिरा लागवड केलेल्या गव्हाचं उत्पादन हे वेळेवर पेरणी केलेल्या गव्हापेक्षा कमी मिळतं.. पण यावर्षी हे उत्पादन आणखी कमी होण्याची शक्यता जातेय.. कारण ओंबीमध्ये दाणा भरण्याच्या वेळी तापमानात वाढ झालेली असते आणि पिकाला हवा तसा गारवा न मिळाल्यामुळं गव्हाचे दाणे लहान राहतात किंवा उत्पादन कमी येतं.. त्यामुळं उत्पादनात घट येण्याची शक्यता लक्षात घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करायचीये..
