Video
Water Stress in Vegetable Crop: कमी पाण्यामुळं भाजीपाला पिकांची काळजी कशी घ्याल?
कमी पावसामुळं नगदी पिकांसोबत भाजीपाला पिकांची अवस्थाही बिकट होत चाललीये.. त्यात मुळातच भाजीपाला पिकांना कायम सिंचन लागतं.. अन्यथा त्यांच्यावर पाण्याचा ताण येऊ लागतो.. पाण्याच्या ताणामुळं पिकाची अन्न बनवण्याची प्रक्रिया मंद होते, पानं सुकायला लागतात, पिकाची वाढ थांबते, फुलं फळं गळू लागतात, कीड रोगांचा प्रादुर्भाव वाढतो आणि एकंदरच फटका शेतकऱ्यांच्या खिशाला बसतो.. त्यामुळं पिकांचा पाण्याचा ताण कसा कमी करायचा, त्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, कीड रोग आल्यास त्यांच्यावर कमी खर्चात नियंत्रण कसं मिळवायचं आणि पिकं कशी वाचवायची हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
