Fertilizer Price : भारतातील खतांच्या किंमतीवर अमेरिकाचा का प्रभाव पडू शकतो?

Global Fertilizer Market:भारतात एक टन युरिया तयार करण्यासाठी आता ६६ हजार रुपये खर्च येतोय. तर चीनमध्ये तयार युरियाचा दर आहे जवळपास साडेबत्तीस हजार रुपये. अर्थात, चीनमधून युरिया भारतात आणण्यासाठी वाहतुकीचा खर्च वेगळा मोजावा लागेल. तरीही देशात युरिया तयार करण्यापेक्षा आयात करणं परवडू शकतं, असं खत उद्योगाचं म्हणणं आहे. त्यामुळे केंद्र सरकारनं युरियाची आणखी आयात करावी, अशी मागणी खत उद्योगानं केलीय. दुसरीकडे, यंदा केंद्र सरकारच्या खत अनुदानाचा खर्च अडीच लाख कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे. मग देशात युरिया उत्पादन एवढं महाग का झालं? खत उद्योगाला चीनमधून आयात का हवीय? आणि या सगळ्याचा शेतकऱ्यांशी काय संबंध आहे? पाहूया आजच्या ॲग्रोवन शोमधून.
Loading content, please wait...