Video
Turmeric Rhizome Fly: हळद पिकावरील कंदमाशी- कंदकुजसाठी प्रतिबंधात्मक उपाय कोणते?
हळद हे जास्त दिवसांचं पीक.. पण सध्या काही भागात कंदमाशीचा प्रादुर्भाव वाढला आहे.. कंदमाशी ही अत्यंत घातक आणि नुकसानकारक कीड.. कारण ती आली म्हणजे कंदकुज होणार.. आणि कंदकुज आली म्हणजे उत्पादनाला फटका बसणार.. यावर्षी आधीच पाऊस कमी त्यात संरक्षित सिंचन करुन शेतकरी पीक वाचवतायेत.. त्यात पावसाच्या खंडामुळं पुन्हा कंदमाशीचा प्रादुर्भाव झाला आणि वेळीच लक्ष दिलं नाही तर उत्पादनात डायरेक्ट ४५ ते ५० टक्के नुकसान होतं.. त्यामुळं कंदकुज रोखण्यासाठी आपल्याला आपण कंदमाशीवर लक्ष ठेवायचंय.. आणि प्रादुर्भाव दिसताच योग्य उपाय करणं गरजेचं आहे.. काय आहेत हे उपाय जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
