Turmeric Rate : हळदीच्या भावात तेजी का? पुढील काळात दर किती राहणार? तज्ज्ञांनी सांगितले

नमस्कार शेतकरी मित्रांनो! गेल्या काही आठवड्यांत हळदीच्या बाजारात मोठी उलाढाल पाहायला मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात हळदीच्या भावात चांगला प्राइस मोमेंटम दिसून आला. फ्युचर्समध्ये भावाने उच्चांक गाठल्यानंतर घसरण आणि त्यानंतर पुन्हा रिकव्हरी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.हळदीच्या भावातील तेजीमागे कॅरीओव्हर स्टॉकची टाइट पोझिशन, वाढलेले क्षेत्र, हवामानाची चिंता, सणासुदीच्या मागणीत होणारी वाढ आणि ग्लोबल मार्केटमधील परिस्थिती हे घटक महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. एक्स्पोर्टमध्ये मोठी वाढ नसली तरी ग्लोबल मार्केटमधील पाइपलाइन आणि आगामी फेस्टिव्ह डिमांड याकडेही बाजाराचे लक्ष आहे.दरम्यान, हळदीच्या स्पॉट आणि फ्युचर्स भावातील मोठ्या फरकामुळे स्पेक्युलेशनची चर्चाही झाली. सध्या स्पॉट आणि फ्युचर्समध्ये सुमारे ₹६५०चा फरक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. फ्युचर्स प्रीमियमवर असल्यामुळे याआधी हा फरक वाढला होता; मात्र आता स्पॉट आणि फ्युचर्समधील हा गॅप कमी होण्याच्या दिशेने असल्याचे संकेत आहेत.मग हळदीच्या भावातील तेजी किती काळ टिकणार? पुढील काळात दर कोणत्या पातळीवर राहू शकतात? जाणून घेऊया तज्ज्ञांचे विश्लेषण.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com