Video
Tomato Sucking Pests: टोमॅटो पिकातील रसशोषक किडींचे नियंत्रण कसे करावे?
तुमच्याही टोमॅटो पिकाची पानं पांढरट, तपकिरी पडून आकसलेली दिसताय का? झाडांची वाढ खुंटलेली वाटतेय का? तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.. सध्या काही भागात टोमॅटो पिकामध्ये फुलकिडे, पांढरी माशी आणि मावा या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळतोय.. या किडी पानांना खरवडून त्यांच्यातला रस शोषून घेतात.. आणि या किडी दिवसाला १० ते २० अंडी घालत असल्यामुळं कमी दिवसात त्यांची संख्या वेगाने वाढते.. आणि प्रादुर्भाव वाढला की परिणाम फक्त पानांवर राहत नाही तर थेट उत्पादनावर होतो. त्यामुळं आपल्याला पिकांचं संरक्षण करायचं असेल तर काळजी घेणंही आवश्यक आहे.. कशी घ्यायची ही काळजी.. यासाठी अखिल भारतीय समन्वित भाजीपाला संशोधन प्रकल्पातील तज्ज्ञांनी माहिती आहे.. तीच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
