Video
Title: Sugarcane Crushing Season: गाळप हंगाम लवकर! उसाची तोडणी केव्हा करावी?
यंदाचा ऊस गाळप हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरु होतोय. साधारणपणे नोव्हेंबरच्या आसपास सुरू होणारा गाळप हंगाम यंदा लवकर सुरू होतोय. सरकारच्या या निर्णयानंतर काही शेतकरी संघटनांनी मात्र त्याला विरोध केला आहे.. पण हा विरोध नेमका कशासाठी? गाळप हंगाम लवकर सुरू झाला, तर शेतकऱ्यांच्या उसाचं नुकसान कसं होऊ शकतं? आणि अपरिपक्व ऊस कारखान्यात गेला तर साखर उताऱ्यावर नेमका काय परिणाम होतो? हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. कारण याचा संबंध थेट उसाचं वजन, साखर उतारा आणि शेतकऱ्याला मिळणाऱ्या पैशांशी आहे. ते नेमकी कसं.. लवकर ऊस तोडल्यावर त्याचा काय परिणाम होतो? आणि ते टाळण्यासाठी काय करायचं.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
