Video
El Nino 2026 : मॉन्सून हंगामात एल निनो सक्रीय होण्याची शक्यता; हवामान संस्थांचा अंदाज
२०२६ च्या मॉन्सून हंगामाच्या कालावधीत एल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञाकडून वर्तवली जात आहे. एल निनो वर्षे असेल तर भारताच्या मॉन्सूनवर परिणाम होतो. म्हणजे दुष्काळच पडतो, असा समज आहे. त्यामुळे २०२६ वर्षे दुष्काळी असेल, या चर्चेनं जोर धरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुक वाढली आहे. त्यामुळे जगभरातील हवामान विभाग काय सांगतात?
