Video
Sugarcane Rust: उसामधील तांबेरा रोगासाठी कोणते बुरशीनाशक वापरावे?
सप्टेंबर महिना म्हटलं की वातावरणात बदल होत असतात.. परतीच्या पावसाची चाहूल असते तर हिवाळ्याला प्रारंभ आणि दिवसा मध्येच कडक ऊन.. पण हे वातावरण उसातल्या तांबेरा रोगाच्या बुरशीला मात्र चांगलंच पोषक असतं. त्यामुळं या काळात उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त असते.. या रोगामुळं उसाची वाढ खुंटते, उत्पादनात मोठी घट होते तसंच उसातल्या साखरेवरही परिणाम होतो आणि सारखेचा उतारा कमी येतो.. सुमारे ४० टक्क्यांपर्यंत हे नुकसान होण्याची शक्यता असते.. त्यामुळं त्याला वेळीच ओळखून योग्य उपाय करणं गरजेचं असतं.. कसा ओळखायचा तांबेरा रोग, आणि याचं नियंत्रण कसं करायचं.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
